“घटस्फोट होऊन 10 वर्ष झाली, काही गोष्टी स्वीकारायला…”; अपूर्वा नेमळेकरने स्पष्टच सांगितले

Apurva Nemlekar | अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेतून घराघरात पोहचली. यातील तिच्या ‘शेवंता’च्या भूमिकेला मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र आता अपूर्वाने अलीकडेच एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
अपूर्वाच्या घटस्फोटाला 10 वर्ष झाली आहे. 2014 मध्ये तिचं रोहन देशपांडे यांच्याशी लग्न झालं होतं, परंतु काही महिन्यांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. मात्र आता पुन्हा एकदा लग्न करायचं, असा खुलासाही तिने यावेळी केला आहे.
अपूर्वी नेमळेकर म्हणाली, “मी लग्न केलं होतं. आता घटस्फोट होऊन 10 वर्ष झाली आहेत. मी त्यातून बाहेर पडली आहे. काही गोष्टी स्वीकारायला वेळ लागला. काही विश्वातघात पचवायला वेळ लागला. आता मला काय नकोय आणि काय हवंय, याची क्लॅरिटी आलेली आहे. पण आता मी एकटी राहायला शिकली आहे. मी बराच वेळ घेतला आणि आता मी तयार आहे.”
पुढे अपूर्वा म्हणाली, “मी सिंगल आहे हे अनेकांना पटत नाही. काही वर्ष रडण्यात गेले तर काही वर्ष स्वतःला सावरण्यात गेली. पण आता सिंगलच बरं आहे असं वाटतं. लग्नसंस्थेवर माझा विश्वास आहे. जर लग्न योग्य व्यक्तीसोबत झालं असेल तर.., ‘लग्न करायचं की नाही, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रेम, विश्वास, प्रामाणिकपणा हे सगळं तुम्हाला मिळणार आहे का? त्यापेक्षा महत्त्वाचं तुम्हा समोरच्याला सर्व काही देऊ शकता का? ज्या दिवशी याची जाणीव होईल, जेव्हा तुम्ही सर्वकाही स्वीकारण्यासाठी तयार होणार, तेव्हाच तुम्ही लग्न केलं पाहिजे.” Apurva Nemlekar |
‘समाजाचा दबाव आहे म्हणून कधीच लग्न करू नका. आपण एखाद्या व्यक्तीची साथ देऊ शकतो का? हे जाणून घेतल्यानंतरच लग्न करा. नाही तर आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. माझा लग्नसंस्थेवर विश्वास आहे. अनुभव घेण्यासाठी ही एक सुंदर गोष्ट आहे. पण, आता मला लग्न पुन्हा अनुभवायचं आहे.” Apurva Nemlekar |
अपूर्वा नेमळेकच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, तिचा अभिनय प्रवास 2011 साली झी मराठीवरील ‘आभास हा’ या मालिकेपासून सुरू झाला. त्यानंतर तिने ‘आराधना’, ‘तू जीवाला गुंतवावे’, ‘तुझं माझं जमतंय’, ‘प्रेम हे’, ‘तू माझा सांगाती’ अशा विविध मालिकांमध्ये काम केले.
याशिवाय तिने ‘इश्क वाला लव्ह’, ‘भाकरखडी 7 किमी’, ‘रावरंभा’, ‘सब कुशल मंगल’ यांसारख्या चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. मात्र ‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेतील ‘शेवंता’ या व्यक्तिरेखेने तिला नवी ओळख मिळाली.
हेही वाचा:
रीम शेखला ‘लाफ्टर शेफ्स 2’च्या सेटवर पुन्हा इजा? व्हिडिओद्वारे दिली हेल्थ अपडेट




