अपूर्वा नेमळेकर नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Apurva Nemlekar | अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंता या भूमिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. यातील तिच्या खलनायिकेच्या पात्राला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. यानंतर तिने स्टार प्रवाह वरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत साकारलेल्या सावनीच्या भूमिकेला देखील उदंड प्रतिसाद मिळाला. यानंतर आता ती पुन्हा एकदा एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
स्टार प्रवाहच्या ‘शुभविवाह’ मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरची एन्ट्री होणार आहे. यात ती एसीपी अपूर्वा पुरोहित हे पात्र साकारणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच ती पोलीस अधिकारी म्हणून दिसणार आहे. त्यामुळे आता शुभविवाह मालिकेत एक नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या भूमिकेतील तिचा लुक देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. Apurva Nemlekar |
View this post on Instagram
या भूमिकेविषयी सांगताना अपूर्वा म्हणाली, “स्टार प्रवाहबरोबर जिव्हाळ्याचं नातं आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मी साकारलेल्या सावनी या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. काही दिवसांपूर्वीच मी एका मुलाखतीमध्ये मला पोलीस अधिकारी साकारायला आवडेल असं म्हटलं होतं. माझी इच्छा या भूमिकेच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. ‘शुभविवाह’ मालिकेत मी एसीपी अपूर्वा पुरोहित हे पात्र साकारणार आहे. पहिल्यांदाच अशा धडाकेबाज रुपात झळकण्याची संधी मिळाली. नवं पात्र साकारताना मी नेहमीच उत्सुकता असते.” Apurva Nemlekar |
दरम्यान, अपूर्वा पुरोहितच्या येण्यामागे नेमकं काय रहस्य आहे? तिच्या येण्याने भूमी-आकाशच्या आयुष्यावर काय परिणाम होणार? याबाबत आता प्रेक्षकांना देखील उत्सुकता लागली आहे. Apurva Nemlekar |
हेही वाचा :
“क्रिकेट आता खेळ राहिला नसून फक्त बिझनेस झाला”; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी





