“काही क्षणांची विश्रांती पुन्हा…”; अपूर्वा नेमळेकरची पोस्ट

Apurva Nemlekar | अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर अलीकडेच ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसली होती. यातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची देखील पसंती मिळाली होती. मात्र आता तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत काही दिवस कोणाच्याही संपर्कात राहणार नसल्याचे सांगितले आहे. यामागचे कारणही तिने सांगितले आहे.
अपूर्वा नेमळेकरने सोशल मीडियावर एक पोस्ट करत लिहिले की, “सर्वांना नमस्कार. मी पुढचे १५ दिवस एक मेडिटेशन कोर्स करणार आहे. त्यामुळे मी तुमच्यासाठी उपलब्ध नसेन. काही क्षणांची विश्रांती पुन्हा परत येण्यासाठी. या काळात मी फोन किंवा सोशल मीडियावर उपलब्ध नसेन”, अशी पोस्ट लिहून जर काही ताताडीचं काम असल्यास कोणाशी संपर्क साधता येईल, याचाही खुलासा केला आहे. Disconnecting to reconnect असं कॅप्शन देऊन अपूर्वाने ही पोस्ट शेअर केली आहे. काही दिवस तिने सर्व गोष्टींमधून ब्रेक घेतला आहे.
अपूर्वा नेमळेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत अपूर्वाने साकारलेली शेवंताची व्यक्तिरेखा खूप गाजली. शेवंता आणि अण्णा नाईक यांची विशेष केमिस्ट्री सर्वांना आवडली. या मालिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली होती. Apurva Nemlekar |
याशिवाय तिने ‘आभास हा’, ‘आराधना’, ‘तू जीवाला गुंतवावे’, ‘तुझं माझं जमतंय’, ‘प्रेम हे’, ‘तू माझा सांगाती’ अशा विविध मालिकांमध्ये काम केले. तिने ‘इश्क वाला लव्ह’, ‘भाकरखडी 7 किमी’, ‘रावरंभा’, ‘सब कुशल मंगल’ यांसारख्या चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. Apurva Nemlekar |
हेही वाचा:





