नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार आणखी एका बायोपिकमध्ये; कोणाची साकारणार भूमिका?

Entertainment : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखला जातो. अनेक चित्रपटांमध्ये आणि वेबसिरीजमध्ये त्याने काम केले आहे. ‘सेक्रेड गेम्स’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ सारख्या चित्रपट आणि वेब सीरिजसह, तो बॉलिवूडमधील प्रतिष्ठित अभिनेत्यांपैकी एक म्हणून नवाजुद्दीनने त्याची ओळख निर्माण केली आहे.
काही वर्षांपुर्वी नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमात काम केले होते. या सिनेमात त्याने साकारलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. त्यानंतर आता नवाजुद्दीन सिद्दीकी आणखी एका बायोपिकमध्ये दिसणार आहे.
दिवंगत रिअल लाइफ कस्टम ऑफिसर कोस्टा फर्नांडिस यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात नवाजुद्दीनची निवड करण्यात आली आहे. सेजल शाह या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. लवकरच गोव्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. कोस्टा फर्नांडिस यांनी 1990 च्या दशकात गोव्यात सोन्याच्या तस्करीच्या विरोधात लढा दिला होता. या सिनेमात कोस्टा फर्नांडिसच्या आयुष्यात घडलेल्या रोमांचक आणि नाट्यमय घटना दाखवल्या जाणार आहेत.
EXCLUSIVE: #NawazuddinSiddiqui to play customs officer Costao Fernandez in his biopic@Nawazuddin_S https://t.co/WyxJlRciNc
— BollyHungama (@Bollyhungama) October 25, 2023
कोण होते कोस्टा फर्नांडिस?
कोस्टा फर्नांडिस हे गोवा कस्टम्समध्ये 1979 मध्ये प्रतिबंधात्मक अधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यांच्या आयुष्यावर आधारीत हा सिनेमा आहे. कोस्टा फर्नांडिस यांनी 1990 च्या दशकात गोव्यात सोन्याच्या तस्करीच्या विरोधात लढा दिला होता. कोस्टा फर्नांडिस यांंनाअनेक जीवघेण्या घटना, गुन्हेगार आणि तस्कर यांच्या चकमकींमुळे लक्षात ठेवले जाते. त्यांनी जीव धोक्यात घालून तस्करीचे अनेक प्रयत्न थांबवले. दरम्यान, नवाजुद्दीनच्या पहिल्यांदाच कस्टम ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. याधी तो OTT वर रिलीज झालेल्या ‘हड्डी’ चित्रपटात दिसला होता.





