Tumbbad 2 : ‘तुंबाड 2’ चित्रपटात बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रीची वर्णी
Tumbbad 2 : 'तुंबाड 2' चित्रपटाचा भाग होण्याबाबत अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद

Tumbbad 2 : ‘तुंबाड’च्या यशानंतर आता त्याचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता ‘तुंबाड 2’ या हॉरर सिनेमातही बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट या बहुप्रतीक्षित सीक्वलमध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सोहम शाहने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
विविध प्रकारच्या भूमिका समर्थपणे साकारण्याच्या क्षमतेसाठी आणि धाडसी भूमिकांच्या निवडीसाठी ओळखली जाणारी आलिया भट्ट ‘तुंबाड २’साठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. आलिया भट्टबरोबर या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी देखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. (Tumbbad 2)
अभिनेता-निर्माते सोहम शाह आणि दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबतची तिची ही पहिलीच जुगलबंदी असणार आहे. सोहम शाह यांनी उभारलेले हे विश्व, नवाझुद्दीन सिद्दीकी यांची प्रभावी अभिनयशैली आणि आलिया भट्टची महत्त्वपूर्ण नवी भूमिका यामुळे ‘तुंबाड २’मध्ये एक वेगळीच रंगत निर्माण होणार आहे. (Tumbbad 2)
‘तुंबाड 2’ बाबत बोलताना आलिया भट्ट म्हणाली, “मी ‘तुंबाड’ पाहिला तेव्हापासून तो सिनेमा माझ्या मनात कायम आहे. इतका वेगळा आणि प्रभावी सिनेमा फार कमी जण बनवू शकतात. काही सिनेमे असे असतात की, जे रिलीज झाल्यानंतरही अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनातून जात नाहीत. अशा जगाचा भाग होणं माझ्यासाठी खूप खास आहे.” ( Tumbbad 2 )
आलिया पुढे म्हणाली, “सोहम आणि नवाजसोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मी अनेक वर्षांपासून या दोन्ही कलाकारांची चाहती आहे. ‘तुंबाड’सारख्या रहस्यमय आणि लक्षात राहणाऱ्या कथेत अशी भूमिका साकारण्याची मी खूप दिवसांपासून वाट पाहत होते.” दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन आदेश प्रसाद करत आहेत. ‘तुंबाड २’ ३ डिसेंबर २०२७ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Tumbbad 2)
हेही वाचा:






