Nawazuddin Siddiqui Birthday: २५०० रुपयांत मुंबईत आलेला मुलगा आज बॉलिवूडचा दमदार अभिनेता; नवाजुद्दीन सिद्दीकींचा प्रेरणादायी प्रवास
Nawazuddin Siddiqui Birthday १९ मे १९७४ रोजी उत्तर प्रदेशातील बुधाना या छोट्या गावात नवाजुद्दीन यांचा जन्म झाला. अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन ते मुंबईत आले. मात्र त्यांच्या खिशात तेव्हा फक्त २५०० रुपये होते.

Nawazuddin Siddiqui Birthday: बॉलिवूडमधील दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आज आपला ५२वा वाढदिवस साजरा करत आहेत. उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावातून मोठी स्वप्ने घेऊन मुंबईत आलेल्या नवाजुद्दीन यांचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. आज करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्याला एक काळ असा पाहावा लागला होता, जेव्हा त्यांच्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते.
१९ मे १९७४ रोजी उत्तर प्रदेशातील बुधाना या छोट्या गावात नवाजुद्दीन यांचा जन्म झाला. अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन ते मुंबईत आले. मात्र त्यांच्या खिशात तेव्हा फक्त २५०० रुपये होते. (Nawazuddin Siddiqui )
मुंबईत सुरुवातीचे दिवस त्यांच्यासाठी खूप कठीण होते. राहण्याची, खाण्याची आणि काम मिळवण्याची सतत धडपड सुरू होती. खर्च भागवण्यासाठी त्यांना सिक्युरिटी गार्डची नोकरीही करावी लागली. अनेकदा परिस्थिती इतकी बिकट व्हायची की, दिवसभर फक्त बिस्किट खाऊन त्यांना दिवस काढावा लागायचा.
एका मुलाखतीत नवाजुद्दीन यांनी त्यांच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण सांगितली होती. त्यांनी सांगितले की, अभिनयाचे शिक्षण घेतल्यानंतर मुंबईत सहज काम मिळेल असे त्यांना वाटले होते. पण वास्तव खूप वेगळे होते. सतत नकार मिळत असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे खचला होता. (Nawazuddin Siddiqui Birthday)

Nawazuddin Siddiqui
नवाजुद्दीन म्हणाले होते की, जवळपास दहा वर्षे त्यांना स्वतःबद्दल वाईट वाटत राहिले. अनेक वेळा मोठे प्रोजेक्ट मिळूनही शेवटच्या क्षणी त्यांना चित्रपटातून बाहेर काढले जायचे. या सगळ्या गोष्टींमुळे ते आतून खूप तुटले होते. ते आपले दुःख कुणालाही दाखवत नसत आणि अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर एकटेच रडत बसायचे.
मात्र त्यांच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट ठरला तो अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘गँग्स ऑफ वासेपूर’ हा चित्रपट. या चित्रपटातील फैजल खानची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. त्यांच्या अभिनयाची आणि संवादफेकीची सर्वत्र चर्चा झाली आणि नवाजुद्दीन रातोरात स्टार बनले. (Nawazuddin Siddiqui Birthday)
यानंतर त्यांनी ‘बजरंगी भाईजान’, ‘मंटो’, ‘रमन राघव २.०’, ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘रात अकेली है’ यांसारख्या चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
आज नवाजुद्दीन सिद्दीकी यांची गणना बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये केली जाते. छोट्या गावातून आलेला आणि संघर्षाने घडलेला हा अभिनेता अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.





