Tumbbad 2 : आलिया भट्ट ‘तुंबाड २’ चित्रपटात झळकणार? प्रसिद्ध अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रीन
Tumbbad 2 :

Tumbbad 2 : अभिनेत्री आलिया भट्टने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. अशातच आता आलिया अजून एका बहुप्रतीक्षित चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे. आलिया भट्टचं नाव ‘तुंबाड २’ चित्रपटाशी जोडलं जात असून, ती चित्रपटाच्या सीक्वलमध्ये झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे.
एका वृत्तानुसार, या हॉरर चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. २०१८ मध्ये आलेल्या ‘तुंबाड’ या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची एंट्री होण्याची शक्यता आहे. ती या चित्रपटात दमदार कॅमिओ करणार आहे. त्यामुळे आता या चित्रपटाची प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
या चित्रपटासाठी मेकर्सना मोठ्या फीमेल स्टारची गरज होती आणि आता आलिया भट्टच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यचं म्हटलं जातं आहे. अलीकडेच ‘तुंबाड २’ ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
हा चित्रपट ३ डिसेंबर २०२७ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘तुंबाड’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि हळूहळू या चित्रपटाने अनेकांची पसंती मिळवली. आता चाहत्यांकडून ‘तुंबाड २’बाबतही मोठ्या अपेक्षा आहेत.
आलिया भट्ट येत्या काळात ‘लव्ह अँड वॉर’ आणि ‘अल्फा’ या दोन चित्रपटांतूनही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हेही वाचा :






