Sri Charani Rewards : आंध्र सरकारकडून श्री चरणीचा मोठा सन्मान! 2.5 कोटी, सरकारी नोकरी अन् भूखंडाची केली बरसात

मुख्यमंत्री नायडूंकडून चरणीचा सत्कार –
शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि कॅबिनेट मंत्री लोकेश नारा यांनी श्री चरणी आणि भारताच्या माजी कर्णधार मिताली राज यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी या दोन्ही क्रिकेटपटूंचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री नायडू यांनी श्री चरणीला तिच्या शानदार कामगिरीसाठी २.५ कोटी रुपयांचा रोख पुरस्कार, ग्रुप-१ सरकारी नोकरी आणि कडपा येथे १००० स्क्वेअर यार्डचा निवासी भूखंड देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.
The Government of Andhra Pradesh, led by Hon’ble Chief Minister Shri N. Chandrababu Naidu Garu has announced a cash award of ₹2.5 crore, a 1,000 sq. yard house site, and a Group-I government job for Ms. Shree Charani in recognition of her exemplary performance in the ICC Women’s… pic.twitter.com/lUHpx1fHy9
— CMO Andhra Pradesh (@AndhraPradeshCM) November 7, 2025
विजयात श्री चरणीचे मोलाचे योगदान –
#WATCH | Amaravati: Cricketer Shree Charani, who played as part of the World Cup-winning Indian Women’s team, met Andhra Pradesh CM N Chandrababu Naidu and Minister Nara Lokesh at the CM’s residence. Former Cricketer and ex-Captain Mithali Raj was also at the meeting.
(Video:… pic.twitter.com/0mAt2svUsr
— ANI (@ANI) November 7, 2025
भारताला पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात या युवा डावखुरा फिरकीपटूची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. श्री चरणीने संपूर्ण स्पर्धेत १४ विकेट्स घेत, ती भारताची दुसरी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यातही तिने एक विकेट्स घेतली होती. तिच्या याच उत्कृष्ट कामगिरीमुळे आंध्र प्रदेश सरकारने तिला ३ मोठे पुरस्कार जाहीर करून सन्मानित केले आहे.
मंधाना, जेमिमा आणि राधा यांनाही बक्षीस –
#LIVE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सत्कार@Dev_Fadnavis @BCCIWomen#Maharashtra #DevendraFadnavis #WomensWorldCup2025 https://t.co/6mFCFBJ4tB
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 7, 2025
फक्त श्री चरणीच नाही, तर उपकर्णधार स्मृती मानधना (सर्वाधिक धावा करणारी खेळाडू), उपांत्य फेरीत दमदार कामगिरी करणारी जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांनाही विशेष बक्षिसे मिळाली आहेत. महाराष्ट्र सरकारने भारतीय संघातील या तिन्ही स्टार खेळाडूंना प्रत्येकी २.२५ कोटी रुपयांचे रोख बक्षीस दिले आहे. या तिघींव्यतिरिक्त, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मजूमदार यांनाही महाराष्ट्र सरकारकडून २२.५० लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले





