Amol Mitkari Emotional Post : “दादा खरच मोठ्या मनाने माफ करा…ह्यामागील अदृश्य शक्ती ओळखता येत नाहीये”; अमोल मिटकरींची भावुक पोस्ट
Amol Mitkari Emotional Post : दादा खरच मोठ्या मनाने माफ करा... आम्ही कपाळ करंटे - अमोल मिटकरी

Amol Mitkari Emotional Post : अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी सातत्याने या अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी करत आहे.
अमोल मिटकरी यांच्याकडून अजित पवार यांचा विमान अपघातात झालेल्या मृत्युच्या विषयावर चर्चा करण्याची मागणी होत आहे. मात्र, विधान परिषदेबरोबरच विधानसभेतही याबद्दल फार चर्चा झालेली नाही.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती मृत्युबद्दल चर्चाच न झाल्याने आमदार मिटकरींनी ट्वीट करत जाहीररित्या नाराजी व्यक्त केली आहे. Amol Mitkari Emotional Post
अमोल मिटकरींचे ट्वीट Amol Mitkari Emotional Post
“आदरणीय दादा आम्हाला माफ करा..आता आवाज काढावा इतका पण आवाज शिल्लक नाही. लोकांच्या प्रपंचाला व सामन्य, अति सामान्य माणसाला न्याय देणारे तुम्ही दुर्दैवाने तुम्हालाच न्याय नाही. आज इतर कुणासोबत अशी दुर्घटना घडली असती व तुम्ही आज असता तर सगळे सुतासारखे सरळ केले असते व चर्चा लावली असती.
मात्र ह्यामागील अदृश्य शक्ती ओळखता येत नाहीये. दादा खरच मोठ्या मनाने माफ करा… आम्ही कपाळ करंटे,” असे भावनिक विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिवंगत अजित पवारांची माफी मागितली. Amol Mitkari Emotional Post
आदरणीय दादा आम्हाला माफ करा..आता आवाज काढावा इतका पण आवाज शिल्लक नाही.लोकांच्या प्रपंचाला व सामन्यअति सामान्य माणसाला न्याय देणारे तुम्ही दुर्दैवाने तुम्हालाच न्याय नाही .आज इतर कुणासोबत अशी दुर्घटना घडली असती व तुम्ही आज असता तर सगळे सुतासारखे सरळ केले असते व चर्चा लावली असती.… pic.twitter.com/MyS71XK7zY
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 16, 2026
अदृश्य शक्ती चर्चा लाऊ देत नाही?
आमदार अमोल मिटकरींनी गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये लिहिले, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात दुर्घटनेची चर्चा तिसऱ्या आठवड्यात पण… दुर्दैवाने एकही ठोस चर्चा नाही.
अदृश्य शक्ती चर्चा लाऊ देत नाही, अशी शंका उपस्थित करावी का, की सरकार झोपेत आहे?’, असा संतप्त सवाल करत त्यांनी “सरकार जागे व्हा, सत्य बाहेर आणा आणि जबाबदारी निश्चित करा”, अशी मागणीही केली आहे. Amol Mitkari Emotional Post
हेही वाचा:






