राष्ट्रवादी फुटीच्या दिशेने जात असताना अमोल कोल्हेंनी केलं मोठं विधान; भाजपमध्ये जाण्याच्या….

मुंबई – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे भाजपच्या वाटेवर असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांची घुसमट होत असल्याचे बोलले जात आहे. अमोल कोल्हे पक्ष्याच्या कार्यक्रमांना आणि बैठकांना देखील दांडी मारत असल्याच्या चर्चा मध्यंतरी सुरु होत्या.
अमोल कोल्हे यांनी याबाबत नकार दिला असला तरी भाजप याबाबत मात्र कायमच संदिग्ध भूमिका घेत आली आहे. मात्र, आता या चर्चांवर खुद्द अमोल कोल्हे यांनीच सडेतोड उत्तर दिलं आहे. नुकतंच त्यांनी दिग्दर्शक आणि संगितकार अवधुत गुप्ते यांच्या ‘खुपते तिथं गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सर्वच प्रश्नांना थेटपणे उत्तरं दिली होती.
या भागाचा एपिसोड अद्याप प्रदर्शित झालेला नाही. पण त्याचा प्रोमो सध्या समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अमोल कोल्हे काही प्रश्नांवर थेटपणे उत्तरं देताना दिसतात. सध्या हा प्रोमो सगळीकडे मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
या यावेळी अवधूत गुप्ते अमोल कोल्हेबाबत बोलताना म्हणाले, “अमोल कोल्हे भाजपसोबत जाणार याबाबत लोक पैज लावत असतात. लहान मुलंही ठाम आहेत की आता कोल्हेंचा एक पाय भाजपमध्ये आहे? असं ते अमोल कोल्हेंना विचारतात.
त्यावर उत्तर देताना कोल्हे म्हणाले, “शेतकऱ्याचा पोरगा आहे त्यामुळं उगाच नांगर खांद्यानावर घेऊन चालणार नाही… आधी आभाळ बघून, मग जमीन कधी नांगरायची हे ठरवावं लागतं. पण हे राजकीय उत्तर आहे, पण खरं उत्तर हे आहे की….” या लाईनवरच प्रोमो कापण्यात आला आहे. त्यामुळं हा संपूर्ण कार्यक्रम प्रदर्शित झाल्यावरच त्यांनी नेमकं काय म्हटलंय हे समजेल.





