Amit Shah on Akhilesh yadav: ‘धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण देणे घटनाबाह्य ‘ ; अमित शाह-अखिलेश यादव यांच्यात शाब्दिक चकमक
Amit Shah on Akhilesh yadav: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आजपासून पुढील 2 दिवस हे विशेष अधिवेशन होणार आहे.

Amit Shah on Akhilesh yadav: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आजपासून पुढील 2 दिवस हे विशेष अधिवेशन होणार आहे. दरम्यान, नरी शक्ती वंदन अभियान या विधेयकावर चर्चा करण्यात येणार आहे. याच चर्चेदरम्यान, आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले.
महिला आरक्षण सुधारणा विधेयकावरील लोकसभेत जनगणनेसंदर्भात अखिलेश यादव यांनी “जनगणना का केली जात नाही?” असा सवाल केला. त्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिले आहे.
अमित शाह यांनी,” मला सभागृहाच्या माध्यमातून देशातील जनतेला हे कळवायचे आहे की, जनगणनेचे काम आधीच सुरू झाले असून ते चालू आहे.” असे म्हटले. पुढे बोलताना शाह म्हणाले, “अखिलेश म्हणाले की ते जात जनगणनेची मागणी करतील. तर त्यांना कळू द्या की सरकारने जात जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. ही जनगणना जात जनगणनेसोबतच केली जात आहे.” Amit Shah on Akhilesh yadav
अमित शाह म्हणाले, “धर्मेंद्र यादव म्हणत आहेत की त्यासाठी कोणताही रकाना नाही. त्यांना हे माहित असले पाहिजे की सध्या घरांची जनगणना केली जात आहे. घरांना कोणतीही जात नसते. जर समाजवादी पक्षाचे चालले असते, तर त्यांनी घरांची जातही निश्चित केली असती.”
त्यांनी हे बोलताच सभागृहात निषेधाचा सूर उमटला. अखिलेश यादव खळखळून हसले. धर्मेंद्र यादव आपल्या जागेवरून उठू लागले. तेव्हा अखिलेश यांनी त्यांना खाली बसण्याचा इशारा केला.
शाह म्हणाले, “जेव्हा व्यक्तींची, नागरिकांची जनगणना केली जाईल, तेव्हा त्यात जातीसाठी एक रकाना समाविष्ट केला जाईल. मी सभागृहाला खात्री देऊ इच्छितो की ही जनगणना जात जनगणनेसोबतच केली जाईल.”
मुस्लिम महिलांच्या आरक्षणावर अमित शाह काय म्हणाले? (Amit Shah on Akhilesh yadav)
धर्मेंद्र यादव यांच्या मुस्लिम महिलांच्या आरक्षणासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह म्हणाले की, “हे पूर्णपणे घटनाबाह्य आहे. आपली राज्यघटना कोणत्याही धर्माच्या आधारावर आरक्षणाला परवानगी देत नाही.”
अमित शाह यांनी समाजवादी पक्षाच्या मुस्लिम महिलांच्या आरक्षणाच्या मागणीलाही प्रत्युत्तर दिले. गृहमंत्री म्हणाले की, धर्माच्या आधारावर मुस्लिमांना कोणत्याही प्रकारचे आरक्षण देणे हे घटनेच्या विरोधात असेल.
मुस्लिम महिला लोकसंख्येच्या निम्मी नाहीत का? Amit Shah on Akhilesh yadav:
अखिलेश म्हणाले की, “अमित शाह यांनी ते घटनाबाह्य असल्याचे म्हटले होते. ते कदाचित धर्माचा संदर्भ देत असतील, पण संपूर्ण देशाला निम्म्या लोकसंख्येसाठी आरक्षण हवे आहे. मला जाणून घ्यायचे आहे की, मुस्लिम महिला लोकसंख्येच्या निम्मी नाहीत का? त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह म्हणाले की, “समाजवादी पक्षाने सर्व तिकिटे मुस्लिम महिलांना द्यावीत आणि त्याला आमचा कोणताही आक्षेप नाही.”






