Amit Shah: राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली अमित शाहांची भेट; सुनेत्रा पवारांची अनुपस्थित, चर्चांना उधाण
Amit Shah: भेटीमागचे नेमके कारण काय?

Amit Shah: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी रविवारी रात्री नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ज्याचा एक फोटो समोर आला आहे.
यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, समीर भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील या फोटोमध्ये दिसत आहेत.
मात्र या फोटोमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार नसल्याने राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजी आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या बरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेसलाही फटका बसला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा आहे.
दरम्यान, ही भेट नेमकी कोणत्या कारणाने घेतली याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खातं पुन्हा मिळावं म्हणून ही भेट झाल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीकडे असलेले अर्थखाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे घेतले होते.
मात्र, आता हे खाते पुन्हा आपल्याला मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी पूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. आता थेट गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली आहे.
माजी मंत्र्याची मंत्रिमंडळात कमबॅक होण्याची चर्चा
विशेष म्हणजे, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अमित शाहांची भेट घेतल्याने मंत्रिमंडळाच्या विस्ताराची देखील चर्चा आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील किंवा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार असल्याची देखील चर्चा या भेटीच्या निमित्ताने होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका माजी मंत्र्याचं लवकरच मंत्रिमंडळात कमबॅक होणार आहे, अशी चर्चा आहे.
हेही वाचा:
Vitamin D Day: रोज उन्हात बसता, तरीही व्हिटॅमिन D कमी? तुमच्या ‘या’ ५ सवयी ठरू शकतात कारण!





