मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड; BMC निवडणुकीपूर्वी भाजपकडून खांदेपालट
BJP Mumbai President Amit Satam | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान आता भाजपकडून मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने एक मराठी चेहरा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमातून मुंबई भाजप अध्यक्ष म्हणून अमित साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अभ्यासू आणि आक्रमक अशी अमित साटम यांची प्रतिमा आहे. त्यांनी संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. मुंबईच्या राजकारणाची जाण आणि कल्पकता त्यांच्याकडे आहे. येत्या काळात त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप मुंबईत घोडदौड राखेल आणि पुन्हा महायुतीची मुंबईत सत्ता येईल हा विश्वास आहे.” यावेळी फडणवीस, रवींद्र चव्हाण व चंद्रशेखर बावनकुळे यांनी साटम यांना पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. BJP Mumbai President Amit Satam |
कोण आहेत अमित साटम?
आमदार अमित साटम यांनी मुंबईच्या पश्चिम उपनगरात नगरसेवक आणि आमदार म्हणून काम केले आहे. ऑक्टोबर 2014 पासून सलग तिसऱ्या कार्यकाळात अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. BJP Mumbai President Amit Satam |
हेही वाचा:
RSSच्या विजयादशमी उत्सवाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुख्य अतिथी; यामागे काय आहे जातीय समीकरण?




