अजित पवारांनी नवाब मालिकांवर दाखवला विश्वास; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत सोपवली मोठी जबाबदारी

NCP Nawab Malik | राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी दमदार कमबॅक केले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिकांकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा नवाब मलिकांकडे सोपवण्यात आली आहे.
मुंबई अध्यक्ष राहिलेले नवाब मलिक यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सोपवली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे.
मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीमध्ये नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, राजू घुगे,आमदार सना मलिक- शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी.
तर निमंत्रित म्हणून दक्षिण जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, उत्तर – पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष अजय विचारे, उत्तर – मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष अर्शद अमीर, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष सुरेश भालेराव यांचा समावेश आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात केली होती अटक
दरम्यान, नवाब मलिक यांच्या ईडीने कारवाई केली होती. नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. ते सुमारे दीड वर्ष तुरुंगात होते. ११ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय जामीन मंजूर केला. दरम्यान, महायुतीत सामील झाल्यानंतर मलिक यांच्या नावाला कायम भाजपकडून विरोध राहिला होता. मात्र अजित पवार यांच्याकडून मलिकांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. NCP Nawab Malik |
हेही वाचा :





