‘जर भारताने ट्रम्प यांना या कामात मदत केली तर…’ ; टॅरिफ वॉरदरम्यान अमेरिकन खासदाराचे मोठे विधान

America on India। दक्षिण कॅरोलिनाच्या अमेरिकन खासदार लिंडसे ग्राहम यांनी भारताला रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करण्यासाठी आपला प्रभाव वापरण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात फोनवर चर्चा झाल्यानंतर काही तासांतच अमेरिकन खासदाराचे हे विधान आले. वॉशिंग्टन आणि नवी दिल्ली यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल असेही ग्राहम म्हणाले.
अमेरिकेशी संबंध सुधारण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रम्पला मदत America on India।
अमेरिकेचे खासदार लिंडसे ग्राहम यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये ग्राहम यांनी, “मी भारतातील माझ्या मित्रांना सांगत आहे की, भारत आणि अमेरिकेतील संबंध सुधारण्यासाठी ते करू शकणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युक्रेनमधील हा रक्तपात संपवण्यासाठी भारताने आपला प्रभाव सुज्ञपणे वापरावा, राष्ट्रपती ट्रम्प यांना मदत करणे.” असे म्हटले आहे.
तसेच पुढे आपल्या पोस्टमध्ये त्यांनी, “पुतिन यांच्या युद्धयंत्रणेसाठी इंधन म्हणून काम करणाऱ्या रशियाकडून स्वस्त तेलाचा भारत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. मला आशा आहे की पुतिन यांच्याशी झालेल्या अलीकडील फोन कॉलमध्ये पंतप्रधान मोदींनी हे युद्ध कायमचे न्याय्य आणि सन्माननीय पद्धतीने संपवण्याची गरज यावर भर दिला असता. मला नेहमीच असे वाटते की या प्रकरणात भारताचा प्रभाव आहे आणि मला आशा आहे की ते देखील या प्रभावाचा हुशारीने वापर करतील.”असेही त्यांनी म्हटले.
अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले. जे त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर संभाषण केल्यानंतर सोशल मीडियावर शेअर केले होते. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले होते की, “माझे मित्र राष्ट्रपती पुतिन यांच्याशी खूप चांगले आणि तपशीलवार संभाषण झाले.” दोन दिवसापूर्वी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात झालेल्या फोन संभाषणात पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनशी संबंधित नवीनतम घडामोडींबद्दल माहिती दिली. America on India।





