Ambadas Danve : सर्वच प्रकरणे सीआयडीकडे जाणे म्हणजे स्थानिक पोलिसांचे अपयश : अंबादास दानवे
Ambadas Danve : पुण्यातील हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Ambadas Danve : पूर्वी एखादेच प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) जात असे. आता मात्र प्रत्येक महत्त्वाचे प्रकरण सीआयडीकडे सोपवावे लागत आहे. एखाद्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा लागणे म्हणजे स्थानिक पोलिस यंत्रणेचे अपयश असल्याची टीका शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी केली. (Ambadas Danve)
हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणातील मृतांच्या पृष्ठभागावर दाणवे यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. (Ambadas Danve)
दानवे म्हणाले, “जर सर्वच प्रकरणांचा तपास सीआयडीकडे द्यावा लागत असेल, तर नागरिकांचा स्थानिक पोलिसांवरील विश्वास कमी होत असल्याचे दिसून येते. या प्रकरणात केवळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करून प्रश्न सुटणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांना सहआरोपी करण्यात आले पाहिजे. तरच अशा प्रकारच्या कृत्यांना आळा बसेल.” (Ambadas Danve)
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “या विभागाला परिसरात काय सुरू आहे याची सविस्तर माहिती असते. काही अधिकारी बेकायदेशीर धंदे सुरू राहावेत यासाठी प्रयत्न करतात, तर परवानाधारक व्यावसायिकांना त्रास देऊन खंडणी वसूल केली जाते,” असा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संबंधित विभागाच्या सचिवांची भेट घेणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. (Ambadas Danve)
विषारी दारू प्रकरणातील मृत्यूंच्या आकडेवारीबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. “काही मृत्यू नैसर्गिक समजून कुटुंबीयांनी चौकशी न करता अंत्यसंस्कार केले. अशा प्रकरणांची पोलिस नोंद नाही, शवविच्छेदन अहवाल नाही. हा तांत्रिक आणि गंभीर मुद्दा असून त्याबाबत सरकारला निर्णय घ्यावा लागेल,” असेही दानवे म्हणाले. (Ambadas Danve)





