MSRTC Officers Suspended : एसटी महामंडळातील तब्बल ‘एवढे’ अधिकारी निलंबित; परिवहन मंत्र्यांची मोठी कारवाई
एसटी महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी कारवाई (MSRTC Officers Suspended) करण्यात आली आहे.

MSRTC Officers Suspended : एसटी महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी कारवाई (MSRTC Officers Suspended) करण्यात आली आहे. कामात प्रचंड हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत महामंडळाने ११ अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
या धडक कारवाईमुळे एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली असून, कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे, निलंबित झालेल्यांमध्ये ‘क्लास वन’ श्रेणीतील ३ बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात भीतीचे वातावरण पसरले आहे.
भाडेवाढ होऊनही उत्पन्न घटल्याने कारवाईचा बडगा
एसटी महामंडळाने गेल्या काही काळात प्रवासी भाड्यात वाढ केली होती. असे असूनही, नाशिक विभागातील प्रवासी उत्पन्न वाढण्याऐवजी गेल्या दोन हंगामात (सिझन) कमालीचे घटले होते. भाडेवाढ होऊनही (MSRTC Officers Suspended) उत्पन्न का बुडत आहे? याचा शोध घेण्यासाठी १० जून रोजी एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयातील दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या समितीने नाशिक विभागाचे अचानक निरीक्षण (इन्स्पेक्शन) केले.
या समितीत माहिती तंत्रज्ञान (IT) महाव्यवस्थापक आणि मुख्य नियोजन अधिकारी यांचा समावेश होता. या तपासणीदरम्यान नाशिक विभागीय कार्यालयातील विविध विभागांमधे आणि डेपोमध्ये कमालीचा ढिसाळ कारभार आणि कामातील हलगर्जीपणा उघडकीस आला.
2 डेपो मॅनेजर्ससह ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांवर कारवाई
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतेच उत्पन्न बुडवणाऱ्या आणि कामात कसूर करणाऱ्यांवर कडक कारवाई (MSRTC Officers Suspended) करण्याचे आदेश दिले होते. मंत्र्यांच्या आदेशानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी ही मोठी कारवाई झाली. निलंबित करण्यात आलेल्या ११ अधिकाऱ्यांमध्ये:
क्लास वन (वर्ग-१) अधिकारी : ३
क्लास टू (वर्ग-२) अधिकारी : ८ (यात दोन डेपो मॅनेजर म्हणजेच आगार व्यवस्थापकांचाही समावेश आहे)
ऑर्डर न स्वीकारल्यास पोस्टाने नोटीस पाठवणार
वरिष्ठ पातळीवरून या ११ अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, जर संबंधित अधिकाऱ्यांनी ही निलंबनाची ऑर्डर स्वीकारण्यास नकार दिला किंवा टाळाटाळ केली, तर त्यांना ही नोटीस थेट त्यांच्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, एकाच वेळी ११ प्रमुख अधिकारी निलंबित झाल्यामुळे नाशिक विभागीय कार्यालयातील दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प झाल्याची चर्चा रंगली आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये घबराट
“उत्पन्न घटल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही,” हा संदेश या कारवाईतून थेट तळागाळातील कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. बड्या अधिकाऱ्यांवरच थेट निलंबनाची कुऱ्हाड कोसळल्यामुळे, आता आपली तर बारी येणार नाही ना? या धास्तीने इतर कर्मचारी आणि अधिकारी आता सतर्क झाले असून कामाला लागले आहेत.






