Alandi News: नळाला तोटी न लावल्यास कनेक्शन कापणार; आळंदी नगरपरिषदेचा इशारा

प्रभात वृत्तसेवा
आळंदी – शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, ज्या घरगुती नळ जोडणीला तोट्या (टॅप) नाहीत, त्यांच्यावर आळंदी नगरपरिषदेने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या पाहणीत अनेक ठिकाणी तोट्या नसल्याने किंवा त्या नादुरुस्त असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याचे समोर आले आहे.
येणारा उन्हाळा लक्षात घेता पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना त्वरित चांगल्या दर्जाची तोटी बसवण्याचे आवाहन केले आहे. सूचना पाळली न गेल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता नळ जोडणी खंडित करण्यात येईल, तसेच संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून ती जपून वापरणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे आवाहन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या मान्यतेने पाणी पुरवठा विभाग प्रमुख संध्या जाधव यांनी केले आहे.





