Robbery News : अकोल्यात भरदिवसा दरोडा; विश्वासू हमालानेच मालकाला लूटले; 50 लाखांचे सोने अन् 4 लाख नेले
Robbery News : अकोला शहरात भरदिवसा एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे.

Robbery News : अकोला शहरात भरदिवसा धक्कादायक घटना घडली असून, गेल्या चार ते पाच वर्षांपासून विश्वासाने कामावर ठेवलेल्या एका हमालानेच आपल्या मालकाचा विश्वासघात करत घरामध्ये दरोडा टाकल्याचा आरोप आहे. मालकाचे हात-पाय बांधून तब्बल 50 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 4 लाख रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. (Robbery News)
माहितीनुसार, अकोल्यातील रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहता मिल रोड, नया जीन परिसरात विजयकुमार गुप्ता हे वास्तव्यास आहेत. ते त्यांच्या घराच्या खालीच गुप्ता फ्लॉवर ऑइल इंडस्ट्रीज नावाने व्यवसाय चालवतात. (Robbery News)
नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास गुप्ता हे आपल्या कामगारांना कामाच्या सूचना देण्यासाठी खाली आले होते. मात्र, त्याच वेळी दबा धरून बसलेल्या तिघांनी त्यांच्यावर अचानक प्राणघातक केला. या दरोड्याचा मुख्य सूत्रधार त्यांच्याकडे गेल्या चार ते पाच वर्षांपासून हमालीचे काम करणारा कामगारच आहे. (Robbery News)
मागील काही दिवसांपासून तो एका नवीन अज्ञात व्यक्तीला सोबत घेऊन येत होता. सोमवारी सकाळी त्याने आणखी एका साथीदाराला सोबत आणले आणि तिघांनी मिळून थेट घरात प्रवेश केला. (Robbery News)
घरात शिरताच या तिघांनी गुप्ता यांना जबर मारहाण केली आणि त्यांचे हात-पाय घट्ट बांधून एका खोलीत डांबून ठेवले. नंतर आरोपींनी घरातील तिजोरीवर डल्ला मारला. यामध्ये एकूण 4 लाखांची रोकड आणि 50 लाखांचे मौल्यवान सोन्याचे दागिने घेऊन आरोपी पसार झाले. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. (Robbery News)
Newasa News : नेवाशात भरदिवसा थरार! हिंदुत्ववादी नेते ऋषिकेश शेटे यांच्या गाडीवर तुफान दगडफेक





