Robbery on Samruddhi Highway : ‘समृद्धी’वर दरोडे टाकणारी टोळी जेरबंद; मुख्य सूत्रधारासह 7 आरोपींना अटक
सिन्नरजवळ एका कुटुंबाला दोन वाहने अडवून मदत करण्याच्या बहाण्याने (Robbery on Samruddhi Highway) तब्बल 18 लाखांना लुटले होते.

Robbery on Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर पडलेल्या दरोड्याच्या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. सिन्नरजवळ एका कुटुंबाला दोन वाहने अडवून मदत करण्याच्या बहाण्याने (Robbery on Samruddhi Highway) तब्बल 18 लाखांना लुटले होते.
विशेष म्हणजे ही घटना 27 ऑगस्ट रोजी घडली होती. अशामध्ये याच महामार्गावर 26 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता लासूर टोलनाक्याजवळ दिवसाढवळ्या एका कुटुंबाला लुटण्याचा प्रकार घडल्याचे समोर आले.
याच घटनेचे डॅशकॅम काही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घटनांनी (Robbery on Samruddhi Highway) संपूर्ण राज्य हादरले होते. तसेच, या महामार्गावरून सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. याच प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली असून पोलिसांनी या प्रकरणातील काही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
किरण गायकवाड, अर्जुन पवार, अशोक शिंदे, लखन काळे, धनाजी पवार, नितीन शिंदे आणि गोविंद पवार अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सिन्नरजवळ वाहनांचे टायर पंक्चर करून एका कुटुंबाला सुमारे 18 लाख रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्याचा तपास करत पोलिसांनी अवघ्या 48 तासांत हा छडा लावला आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपास आणि वाहनाच्या डॅशकॅम फुटेजच्या आधारे शोध घेत बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार किरण गायकवाड याला मध्यरात्री राहत्या घरातून अटक केली. तसेच, नाशिक पोलिसांनी या प्रकरणातील 7 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच, अद्याप 5 आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
ही गुन्हेगारांची टोळी धाराशिवची आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर जवळील समृद्धी महामार्गावर (Robbery on Samruddhi Highway) या दरोडेखोरांनी दोन वाहनातील प्रवाशांना लुटले होते. या दरोडेखोरांनी घटनास्थळापासून तब्बल 5 किमी अंतरावर स्वत:ची वाहने उभी केली होती. या गुन्हेगारांना अटक करण्यासाठी तेरखेडा, पाणगाव, खामकरवाडी आणि उमरा गावात पोलिसांनी कोंम्बिंग ऑपरेशन केले. गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही वाहनही पोलिसांनी जप्त केली आहेत.






