Rahane Joins ETPL : निवृत्तीच्या अवघ्या काही दिवसांतच अजिंक्य रहाणेची मोठी घोषणा! ‘या’ नव्या परदेशी संघातून खेळताना दिसणार
Rahane Joins ETPL, : २६ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या युरोपियन टी२० लीगमध्ये अजिंक्य रहाणेने ॲमस्टरडॅम फ्लेम्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

Ajinkya Rahane Joins Amsterdam Flames European T20 Premier League : नुकतीच ३० जुलै रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा भारतीय संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आता आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच एका विदेशी टी-२० लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. २६ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ‘युरोपियन टी-२० प्रीमियर लीग’च्या (ETPL) पहिल्या हंगामात रहाणेचा ‘एम्स्टर्डम फ्लेम्स’ (Amsterdam Flames) संघात ‘मार्की खेळाडू’ (Marquee Player) म्हणून समावेश करण्यात आला आहे. ७ ऑगस्ट रोजी यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आली.
कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होणाऱ्या रहाणेकडे ३०८ टी-२० सामन्यांचा मोठा अनुभव असून, त्याच्या खात्यात ३०.२९ च्या सरासरीने ७,९६८ धावा, ५६ अर्धशतके आणि २ शतके जमा आहेत.
“क्रिकेटने मला खूप काही दिले…”
Welcoming a true leader of the game to the ETPL family! 👏
Calm under pressure, rich in experience, and always leading by example — Former India captain, Ajinkya Rahane, is ready to write a new chapter, with the Amsterdam Flames. 🔥
Welcome aboard, Ajinkya! ✨#ETPL pic.twitter.com/pCvpkVor7u
— European T20 Premier League (ETPL) (@etplofficial) August 7, 2026
या नव्या प्रवासाबाबत बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला, “क्रिकेटने मला आजवर खूप काही दिले आहे. या खेळाला काहीतरी परत देणे ही आपली जबाबदारी आहे, असे मी नेहमी मानतो. युरोपमध्ये क्रिकेटची लोकप्रियता वाढत असून तेथे खूप वाव आहे. एम्स्टर्डम फ्लेम्सच्या सहकार्याने मैदानात उत्कृष्ट कामगिरी करण्यासोबतच पुढील पिढीला प्रेरित करण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे.”
स्टीव्ह स्मिथ, मिचेल मार्शसोबत खेळणार!
The stage is set! The fixtures are locked 🏏🔥
The full schedule for the inaugural ETPL season is here!
European cricket enters a new era on August 26, featuring world-class stars, local talent, and blockbuster clashes.#ETPL pic.twitter.com/lo8sq64AKU
— European T20 Premier League (ETPL) (@etplofficial) July 28, 2026
विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचे दिग्गज स्टीव्ह वॉ हे एम्स्टर्डम फ्लेम्सचे सह-संस्थापक आणि मुख्य क्रिकेट अधिकारी आहेत. एम्स्टर्डम फ्लेम्स संघात अजिंक्य रहाणेसोबतच स्टीव्ह स्मिथ, टिम डेव्हिड, मायकल ब्रेसवेल आणि कर्णधार मिचेल मार्श यांसारखे जागतिक दर्जाचे खेळाडू खेळताना दिसतील.
२६ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा रंगणार असून, एम्स्टर्डम फ्लेम्स आपला पहिला सामना २६ ऑगस्ट रोजी ‘रॉटरडॅम डॉकर्स’विरुद्ध वूरबर्ग येथील मैदानात भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:४५ वाजता खेळेल.





