सोलापूर-पुणे-कल्याण बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात ; २ जागीच ठार, दोन गंभीर जखमी

Ahmednagar Accident । राज्यात मागील काही दिवसांपासून अपघातांच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. त्यातच आता अहमदनगरमध्ये एक भीषण अपघाताची घटना घडलीय. नगर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. यात दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर दोन गंभीर जखमी झालेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, “सोलापूर-पुणे-कल्याण बायपासवर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. सुरुवातीला बायपासवर ट्रेलर आणि ट्रकची (Truck) समोरासमोर धडक झाली. यानंतर अपघातग्रस्त ट्रेलरला एका कारने मागून धडक दिली.
ट्रेलर आणि ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू Ahmednagar Accident ।
या भीषण अपघातात ट्रेलर आणि ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अहमदनगर जिल्हा रुग्णालयात (Ahmednagar Civil Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे बायपास रोडवर काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.
नगरमध्ये इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग Ahmednagar Accident ।
दरम्यान, अहमदनगर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक दुकानाला लागली भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशामन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. नगर-मनमाड महामार्गावरील एका शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकानाला आग लागली आहे. आग लागलेल्या दुकानाच्या आजूबाजूला दुकाने असल्यामुळे अग्निशामक दलाने तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आग नेमकी कशामुळे लागली? याबाबत अद्याप स्पष्टता नाही.





