Air India Plane Crash : अहमदाबाद येथील विमान अपघात की घातपात? NIA ने स्पष्टचं सांगितलं?

Gujarat Air India Plane Crash : गुजरातमधील अहमदाबाद येथे घडलेल्या एअर इंडिया विमान अपघातानंतर अनेक तपास यंत्रणांनी धाव घेतली आहे. DGCA, NIA, NSG, आणि गुजरात ATSसह अर्धा डझनहून अधिक एजन्सीज या दुर्घटनेच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेनंतर NIAने घातपाताची शक्यता फेटाळली आहे. अपघातामागील नेमके तांत्रिक किंवा मानवी कारण शोधण्यावर भर दिला जात आहे.
फॉरेन्सिक विभागाकडून ब्लॅक बॉक्स आणि डिव्हीडीआर (डिजिटल व्हॉइस डेटा रेकॉर्डर) चे विश्लेषण सुरू आहे. NSGची टीम घटनास्थळी पुन्हा तपास करणार असून, केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समितीदेखील कार्यरत आहे. ही समिती लवकरच अपघातस्थळी भेट देणार असून, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी धोरणात्मक उपाय सुचवणार आहे.
या दुर्घटनेनंतर नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) बोईंग 787-8 आणि 787-9 या विमानांवर कडक देखभाल नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जूनपासून हे नवे नियम अमलात येणार आहेत.
DGCA चा निर्णयानुसार तपासणीचे महत्त्वाचे निकष
इंधन प्रणाली व अॅक्युएटर तपासणी
केबिन एअर कॉम्प्रेसरची कार्यप्रणाली
इलेक्ट्रॉनिक इंजिन कंट्रोल सिस्टम
टेकऑफ संबंधित पॅरामीटर्सचा आढावा
पॉवर अॅश्युरन्स चेक अनिवार्य
हायड्रॉलिक प्रणालीची स्थिती
15 दिवसांत घडलेल्या तांत्रिक बिघाडांचे पुनरावलोकन
या निर्णयामुळे भविष्यातील विमान अपघातांची शक्यता कमी करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तपासाला गती
NSG ची टीम घटनास्थळी तपास करत आहे, तर ब्लॅक बॉक्स चे विश्लेषण अपघाताच्या कारणांचा खुलासा करेल.
केंद्रीय गृहसचिवांची समिती विमान सुरक्षा आणि नियमावली सुधारणांवर लक्ष केंद्रित करत आहे.
अपघातात 274 जणांचा मृत्यू झाला असून, यात 241 प्रवासी आणि क्रू मेंबर्स, तसेच 33 स्थानिक रहिवाशांचा समावेश आहे.





