MLC Election : अहिल्यानगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारणाला वेग आला असून, माजी महापौर संदीप कोतकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे सुरू असलेल्या राजकीय हालचाली आता निर्णायक टप्प्यात पोहोचल्याची चर्चा रंगू लागली आहे. (MLC Election) विधानपरिषेदेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळणार? MLC Election सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत संदीप कोतकर यांची गुप्त बैठक पार पडली आहे. पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळाल्यास केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत शनिवारी शिर्डीत होणाऱ्या कार्यक्रमात कोतकर यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीच्या समीकरणात अचानक मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. (MLC Election) चार वर्षांपासून रिक्त असलेल्या या विधान परिषद जागेसाठी अनेक दिग्गज इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिवंगत माजी आमदार अरुण जगताप यांनी सलग दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. जानेवारी 2022 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही जागा रिक्त राहिली होती. (MLC Election) या निवडणुकीच्या शर्यतीत प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्यासह संदीप कोतकर यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी कोतकर यांनी वाढवलेला संपर्क, त्यांची संघटनात्मक ताकद आणि आर्थिक क्षमता यामुळे भाजप नेतृत्व त्यांच्याकडे गंभीरपणे पाहत असल्याचे बोलले जात आहे. (MLC Election) राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत कोतकर परिवाराने घेतलेली भूमिका देखील पुन्हा चर्चेत आली आहे. सुवर्णा कोतकर यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. (MLC Election) त्यानंतर महापालिका निवडणुकीत भानुदास कोतकर यांनी देखील शेवटच्या क्षणी माघार घेतली होती. सलग दोन निवडणुकांमध्ये मागे राहिल्यानंतर आता कोतकर परिवार विधान परिषदेसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. (MLC Election) या निवडणुकीत महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीतील नगरसेवक निर्णायक भूमिका बजावणार आहेत. जिल्ह्यात भाजपकडे सर्वाधिक मतदारसंख्या असल्याने अनेक इच्छुक भाजपच्या छत्राखाली येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत कोतकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. (MLC Election) प्राजक्त तनपुरे यांचे नाव चर्चेत (MLC Election) दरम्यान, राहुरी पोटनिवडणुकीत घेतलेल्या भूमिकेमुळे प्राजक्त तनपुरे यांचे नावही भाजपच्या चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांच्या बाजूने अद्याप स्पष्ट सकारात्मक संकेत मिळालेले नाहीत. दुसरीकडे, सचिन जगताप यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर “नेक्स्ट एमएलसी” अशा पोस्ट व्हायरल होत असल्याने जगताप कुटुंबाची भूमिका काय राहणार याकडेही लक्ष लागले आहे. (MLC Election) या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमदार अक्षय कर्डीले आणि संदीप कोतकर यांचे कौटुंबिक संबंध. कर्डीले हे कोतकर यांचे मेहुणे असून, राहुरी पोटनिवडणुकीत सुवर्णा कोतकर आणि उदयनराजे कोतकर यांनी अक्षय कर्डीले यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे भविष्यात कर्डीले-कोतकर हे एकाच राजकीय व्यासपीठावर दिसण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. (MLC Election) अहिल्यानगरच्या राजकारणात पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार असून, भाजप अखेर कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार आणि संदीप कोतकर यांची राजकीय खेळी कितपत यशस्वी ठरणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (MLC Election)