Prajakt Tanpure : राष्ट्रवादीचे(शप) माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याविरुद्धची ईडीची कारवाई रद्द करण्यात आली आहे. त्यांच्या विरुद्ध सुरू असलेल्या चौकशीचा ससेमिरा आता थांबविण्यात यावा व या प्रकरणी जप्त करण्यात आलेली त्यांची मालमत्ता मुक्त करावी, असे आदेश न्यायालयाने दिले. (Prajakt Tanpure) राहुरी विधानसभा पोटनिवडणूकसाठी उद्या मतदान होणार असून त्याच्या आदल्यादिवशी न्यायालयाने निकाल दिल्याने तनपुरे यांच्या निवडणूक माघारीचे कारण आता काही अंशी स्पष्ट झाल्याचे दिसत आहे. राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून 2011 पासून तनपुरे यांची चौकशी सुरू होती. (Prajakt Tanpure) त्यामध्ये त्यांच्या साखर कारखान्याची मालमत्ताही जप्त केली होती. विदर्भातील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखान्याच्या विक्री व लिलावमध्ये गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणी ईडीकडून तपास सुरू होता. यात ईडीकडून नागपूरमधील 7.6 कोटींच्या मालमत्तेसह कारखान्याची जमीन जप्त केली होती. (Prajakt Tanpure)