Ahan Pandey :सैयारा चित्रपटाच्या रिलीजनंतर अहानवर झाली होती शस्त्रक्रिया; खुलासा करत म्हणाला “बराच वेळ…”
Ahan Pandey : सैयारा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अहान पांडेवर शस्त्रक्रिया झाली होती. नेमकं काय झालं होतं याविषयी त्याने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

Ahan Pandey : २०२५ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या ‘सैयारा’ चित्रपटामुळे अभिनेता अहान पांडे रातोरात स्टार झाला. त्याने पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची दखल घ्यायला भाग पाडले. या चित्रपटामुळे तो घराघरात पोहोचला.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता अहान पांडे याने मोठा खुलासा केला आहे. सैयारा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्याला काही दिवस बरे होण्यासाठी लागले असे त्याने सांगितले आहे. तसेच डॉक्टरांनी त्याला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला होता, असेही तो म्हणाला.
एस्क्वायर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अहान पांडे म्हणाला, “सैयारा चित्रपटाच्या रिलीजनंतर गेल्या वर्षी माझी शस्त्रक्रिया झाली. ही एक वेदनादायी शस्त्रक्रिया होती आणि त्यातून बरे होण्यासाठी बराच वेळ लागला.” अहानने स्पष्ट केले की काही वर्षांपूर्वी त्याचा स्नोमोबाईल अपघात झाला होता, ज्यामुळे त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. यामुळे त्याला जिममध्ये त्याच्या फिटनेसवर काम करणे कठीण जात होते.
दरम्यान, अहान आता बरा आहे आणि दिग्दर्शक अली अब्बास जफरसोबत एका अॅक्शन-रोमँटिक चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटात अहानसोबत अभिनेत्री शर्वरी वाघ झळकणार आहे.
स्नोमोबाईल अपघात म्हणजे काय?
स्नोमोबाईलला स्की-डू असंही म्हणतात. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास ती एक प्रकारची स्नो स्कूटर असेत. ही एक अशा प्रकारची स्कूटर आहे, जी अतीप्रचंड थंडी आणि हिमच्छादित प्रदेशांमध्ये उत्तमरित्या चालू शकते. बर्फावर चालणारी ही स्कूटर डांबरी रस्त्यांवर वापरली जात नाही. या छंदाप्रती असणारी अनेकांची आवड पाहता त्याला खेळाचंही स्वरुप प्राप्त आहे. हा छंद अहान पांडेला देखील आहे.





