Operation Tiger : काय झाडी? काय डोंगरनंतर आता बंडखोर 6 खासदार ‘या’ ठिकाणी असल्याची माहिती समोर…
Operation Tiger : बैठकीसाठी लोकसभेचे एकूण 9 पैकी 3 खासदार उपस्थित

Operation Tiger : ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज (18 जून) संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली होती. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला होता. परंतु या बैठकीसाठी लोकसभेचे एकूण 9 पैकी 3 खासदार उपस्थित राहिले.
ऑपरेशन टायगरमधील चर्चेत असणारे 6 खासदार गैरहजर राहिल्याने एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. हे सर्व बंडखोर खासदार दिल्लीतील ‘लीला हॉटेल’मध्ये मुक्कामी असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता या सर्व 6 खासदारांना गुरुवारी पहाटेच दिल्लीतून थेट राजस्थानच्या जयपूर येथे हलवण्यात आल्याची अत्यंत माहिती समोर आली आहे. (Operation Tiger)
6 खासदारांकडे दोन-तृतीयांश बहुमत असल्यामुळे कायदेशीर लढाईत शिंदे गटच वरचढ ठरणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच या संपूर्ण ऑपरेशनची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली होती.
दरम्यान, ठाकरे गटाचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी दिल्लीत संसदीय पक्षाची बैठक बोलावली होती. मात्र, बंडखोर खासदारांचे मन बदलू नये आणि त्यांनी कोणत्याही परिस्थितीत ठाकरेंच्या बैठकीला उपस्थित राहू नये, याची खबरदारी शिंदे गटाकडून घेण्यात आली. त्यामुळेच त्यांना दिल्लीच्या ‘लीला’ हॉटेलमधून थेट महाराष्ट्राबाहेर म्हणजेच जयपूरला सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. (Operation Tiger)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लीला’ हॉटेलमध्ये असलेल्या सर्व 6 खासदारांसोबत तब्बल 30 मिनिटे ‘कॉन्फरन्स कॉल’वर सविस्तर चर्चा केली असल्याची माहिती देखील काही वृत्तानुसार समोर येत आहे.
शिवसेना शिंदे गटामध्ये जाणारे खासदार
ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटामध्ये जाणाऱ्या खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील यांचा समावेश आहे. हे सहा खासदार ठाकरेंच्या बैठकीला गैरहजर होते.
आता अनुपस्थित राहिलेल्या या 6 खासदारांवर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी आणि त्यांना अपात्र करण्यात यावे, यासाठी ठाकरे गट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे लेखी मागणी नोंदवणार आहे.
हेही वाचा:
Suhasini Mulay : वयाच्या ६०व्या वर्षी अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ; फेसबुकवर ओळख होताच घेतला निर्णय







