Shivsena Politics : मोठा राजकीय भूकंप! 16 आमदार अन् 7 खासदार ठाकरेंची साथ सोडणार ? एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीय आमदाराचा दावा
Shivsena Politics : कृपाल तुमाने यांचा दावा प्रत्यक्षात उतरतो की तो केवळ राजकीय दबावतंत्राचा भाग ठरतो, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Shivsena Politics : राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगली असून, शिवसेना (शिंदे गट)चे ज्येष्ठ नेते आणि आमदार कृपाल तुमाने यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाबाबत मोठा दावा केला आहे.
उद्धव ठाकरे गटातील १६ आमदार आणि ७ खासदार पक्षांतराच्या तयारीत असून, त्यांच्याशी अंतिम स्तरावरील वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत. आता केवळ पक्षप्रवेशाची तारीख निश्चित होणे बाकी असल्याचा दावा तुमाने यांनी केला आहे.
पावसाळी अधिवेशनानंतर ‘ऑपरेशन टायगर’ – (Shivsena Politics)
तुमाने यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित लोकप्रतिनिधींमध्ये उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीबाबत नाराजी असून, पावसाळी अधिवेशनानंतर ‘ऑपरेशन टायगर’ प्रत्यक्षात येऊ शकते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
मात्र, या दाव्याला शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टपणे फेटाळून लावले आहे. तसेच भाजपनेही या संपूर्ण प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे संकेत दिले आहेत.
“ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं” (Shivsena Politics)

Shivsena Politics : मोठा राजकीय भूकंप! 16 आमदार अन् 7 खासदार ठाकरेंची साथ सोडणार ? एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीय आमदाराचा दावा
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनीही अलीकडील बैठकीत नाराजी व्यक्त करत, “ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं. जबरदस्तीने कोणाला थांबवण्यात अर्थ नाही,” अशी भूमिका मांडली. त्यांच्या या वक्तव्यानंतर पक्षातील संभाव्य नाराजीच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.
मातोश्रीवरील अलीकडील बैठकीला काही खासदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय तर्क-वितर्कांना बळ मिळाले असले, तरी अद्याप कोणत्याही आमदार किंवा खासदाराने अधिकृतपणे पक्षांतराची घोषणा केलेली नाही. (Shivsena Politics)
त्यामुळे कृपाल तुमाने यांचा दावा प्रत्यक्षात उतरतो की तो केवळ राजकीय दबावतंत्राचा भाग ठरतो, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




