Operation Tiger : जोर का झटका! ठाकरेंचा पक्ष दुसऱ्यांदा फुटला; आदेशानंतरही ओमराजे निंबाळकरांसह 6 खासदार अनुपस्थित
Operation Tiger : बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन

Operation Tiger : शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले असून ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज (18 जून) संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली होती. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला होता.
परंतु या बैठकीसाठी लोकसभेचे एकूण 9 पैकी 3 खासदार उपस्थित राहिले. ऑपरेशन टायगरमधील चर्चेत असणारे 6 खासदार गैरहजर राहिल्याने एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे
शिवसेना ठाकरे गटाचे सहाही खासदार अरविंद सावंत यांनी बोलावलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत अनुपस्थित राहिले आहेत. या बैठकीला गटनेते अरविंद सावंत, राज्यसभा खासदार संजय राऊत, खासदार राजाभाऊ वाजे आणि अनिल देसाई हे चारच खासदार उपस्थित होते.
त्यामुळे ठाकरेंच्या सहा खासदारांनी बंड केल्याचं दिसत आहे. दरम्यान खासदारांचा स्वतंत्र गट लवकरच शिवसेनेत विलीन करण्यात येणार असून शिंदेंचे 6 खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करुन आपली बाजू मांडतील, असं सांगण्यात येत आहे. Operation Tiger
शिवसेना शिंदे गटामध्ये जाणारे खासदार
ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटामध्ये जाणाऱ्या खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील यांचा समावेश आहे. हे सहा खासदार ठाकरेंच्या बैठकीला गैरहजर होते. (Operation Tiger)
अनुपस्थित खासदारांना नोटीस पाठवली जाणार
दरम्यान, बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना आजच नोटीस पाठवली जाणार आहे. ठाकरे गटाकडून तातडीने नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नोटीसवर प्रत्येक खासदारांकडून उत्तर मागवले जाणार आहे. नोटीसला उत्तर देण्यासाठी केवळ काही तासांचाच वेळ दिला जाईल. दिलेल्या वेळेत उत्तर न आल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
ठाकरे गट आक्रमक
दुसरीकडे, बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यास सुरूवात झाली आहे. घोषणाबाजी करत ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा:






