Suhasini Mulay : वयाच्या ६०व्या वर्षी अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ; फेसबुकवर ओळख होताच घेतला निर्णय
Suhasini Mulay : पहिल्या भेटीनंतर अवघ्या ७५ दिवसांत सुहासिनी आणि अतुल यांनी लग्न करण्याचा निर्णय

Suhasini Mulay : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री सुहासिनी मुळे (Suhasini Mulay) यांनी वयाच्या ६०व्या वर्षी लग्नगाठ बांधली आहे. त्यांनी वयाच्या साठीत फेसबुक फ्रेंडसोबत लग्न केलं.
मराठमोळ्या सुहासिनी मुळे यांना योग्य व्यक्ती न भेटल्यामुळे वयाच्या साठीपर्यंत त्या अविवाहित राहिल्या. पण, एक दिवस अचानक एका शास्त्रज्ञासोबत त्यांची ओळख झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुहासिनी मुळे यांच्या पतीचं नाव अतुल गुर्टू असं आहे.
सुहाना सफरला दिलेल्या मुलाखतीत सुहासिनी मुळे म्हणाल्या, “माझं फेसबुकवर अकाऊंट नव्हतं. एका मित्राने मला फेसबुकवर अकाऊंट उघडण्यास सांगितलं. तेव्हा मला फेसबुकवर सायनटिस्ट अतुल गुर्टू यांचं प्रोफाइल दिसलं तेव्हा ते लॉर्ज हैड्रॉन कोलायडर इथे काम करत होते. (Suhasini Mulay)
मला सायन्समध्ये रस असल्याने मी त्यांना मेसेज केला होता. मी त्यांना एक मेसेज पाठवून विचारलं की, ‘LHC म्हणजे काय?’ त्यांच्या उत्तरानं आमच्या संभाषणाला सुरुवात झाली, ज्यानं आम्हा दोघांचंही आयुष्य बदलून टाकलं.
तेव्हा अतुल यांनी एकदा लाइफ पार्टनर शोधत असल्याचं सांगितलं. पण, मला वाटलेलं की, जर मला 60 वर्षांत माझ्यासाठी योग्य व्यक्ती सापडली नाही, तर तो मला आता अचानक कसा सापडेल?”
त्यावेळी सुहासिनी मुळे यांना त्यांच्या मैत्रिणीनं सांगितलं की, “या वयात पर्याय मर्यादित असतात. दार उघडण्याआधीच ते बंद करू नकोस.” मग पहिल्या भेटीनंतर अवघ्या ७५ दिवसांत सुहासिनी आणि अतुल यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. (Suhasini Mulay)
हेही वाचा:
US-Iran Deal: “आता वेळ आलीय…” ; अमेरिकेसोबतच्या ऐतिहासिक शांतता करारानंतर इराणची पहिली प्रतिक्रिया






