Earthquake News : मोठी बातमी! अफगाणिस्तानात 6.2 रिश्टरचा शक्तिशाली भूकंप; काश्मीरपासून दिल्ली-NCR पर्यंत हादरली धरती
Earthquake News : शनिवारी संध्याकाळी आशिया खंडातील अनेक देशांना भूकंपाचा (Earthquake) तीव्र धक्का बसला आहे. अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये ६.२ रिश्टर तीव्रतेचा अत्यंत शक्तिशाली भूकंप झाला.

Earthquake News : शनिवारी संध्याकाळी अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये 6.2 रिश्टर तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये जाणवले. दिल्ली-एनसीआर, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरिदाबाद परिसरातही नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. (Earthquake News)
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (NCS) माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील हिंदुकुश प्रदेशात होता. हा भूकंप जमिनीखाली सुमारे 215 किलोमीटर खोलीवर झाला. भूकंपानंतर अनेक ठिकाणी नागरिकांनी खबरदारी म्हणून घरे आणि उंच इमारती रिकाम्या केल्या. (Earthquake News)
काश्मीरमध्ये सर्वाधिक धक्के
जम्मू-काश्मीरमध्ये या भूकंपाचे धक्के सर्वाधिक तीव्रतेने जाणवले. श्रीनगर, बारामुल्ला, अनंतनाग आणि पूंछसह अनेक भागांमध्ये नागरिक घराबाहेर पडले. काश्मीर हा भूकंपाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील भूकंपीय क्षेत्र-5 मध्ये येत असल्याने अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. (Earthquake News)
दिल्ली-एनसीआरमध्येही जाणवले धक्के
दिल्लीसह नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरिदाबादमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. अनेक कार्यालये आणि निवासी संकुलांमधील लोक सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने बाहेर आले. मात्र, सध्या भारतात कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. (Earthquake News)
हिंदुकुशमध्ये वारंवार का होतात भूकंप?
भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, भारतीय प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्यात सतत होणाऱ्या धडकेमुळे अफगाणिस्तान, हिंदुकुश आणि हिमालय परिसरात वारंवार भूकंप होतात. या भागात जमिनीखाली मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाल्यानंतर खडक तुटतात आणि त्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. त्यामुळे खोलवर झालेल्या भूकंपाच्या लाटा शेकडो किलोमीटर दूरपर्यंत पोहोचतात आणि भारतातील उत्तर भागातही त्यांचे धक्के जाणवतात. (Earthquake News)





