Rashid Khan : …अखेर राशिदने ‘त्या’ मिस्ट्री गर्लबद्दल केला खुलासा; म्हणाला, ‘ती माझी दुसरी…’, पाहा VIDEO

Rashid Khan clarifies viral photo with a woman : अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू आणि टी-२० संघाचा कर्णधार राशिद खान याने नुकत्याच झालेल्या एका चॅरिटी कार्यक्रमातील व्हायरल फोटोंमुळे सुरू झालेल्या चर्चांवर पडदा टाकला आहे. एका महिलेसोबत बसलेला राशिद खानचा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता. तसेच त्याने अवघ्या एका वर्षातचं दुसरे लग्न केल्याचे दावे केले जात होते. या चर्चांना उत्तर देण्यासाठी राशिद खानने तातडीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत महत्त्वपूर्ण खुलासा केला.
चर्चेला का झाली होती सुरुवात –
या महिन्याच्या सुरुवातीला नेदरलँड्समध्ये ‘राशिद खान चॅरिटी फाउंडेशन’च्या उद्घाटन सोहळ्यातील राशिद आणि एका अज्ञात महिलेचा फोटो व्हायरल झाला होता. पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या या महिलेसोबत राशिद बसलेला दिसत होता, ज्यामुळे त्यांच्या गुप्त लग्नाबद्दल चर्चा सुरू झाली होती.
Didn’t know Rashid Khan had motion like that. Pretty wife namkhuda.
Maybe I should start playing cricket. pic.twitter.com/0PyFYRelsk
— Qalandar (@shamali_wal) November 9, 2025
राशिद खानने दिले स्पष्टीकरण –
د زړونو خان د خپل خیریه بنسټ پرانیسته وکړه🌟❤😚
.
.
.
.
.#RashidKhan #AfghanistanCricketBoard #foundation #viralvideo #foryouシpage pic.twitter.com/cE5nau10dk— Yasar Khan (@yasarkhanf) November 8, 2025
मंगळवारी (११ नोव्हेंबर) लेग-स्पिनर राशिद खान याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यामातून चर्चांना पूर्णविराम दिला. त्याने स्पष्ट केले की, फोटोत दिसणारी महिला दुसरी कोणी नसून त्याची पत्नी आहे. राशिदने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “२ ऑगस्ट रोजी मी माझ्या आयुष्यातील एका नवीन आणि महत्त्वाच्या अध्यायाची सुरुवात केली. माझा विवाह झाला आहे आणि मी त्या महिलेशी विवाह केला, जी प्रेम, शांती आणि भागीदारीचे प्रतीक आहे, जसे मला नेहमीच हवे होते.”
चॅरिटी इव्हेंटवरील खेद –
View this post on Instagram
त्याने पुढे स्पष्ट केले की, “मी माझ्या पत्नीला एका चॅरिटी इव्हेंटमध्ये घेऊन गेलो होतो आणि दुर्दैवाने या साध्या गोष्टीमुळे अनावश्यक अंदाज लावले जाऊ लागले. सत्य खूप सरळ आहे, ती माझी पत्नी आहे आणि यात लपवण्यासारखे काहीही नाही.” राशिद खानने यावेळी चाहत्यांना विनंती केली की, त्यांनी त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल चुकीची माहिती पसरवणे टाळावे. त्याने आपल्या पत्नीच्या गोपनीयतेचा (प्रायव्हसी) आदर करत तिची ओळख सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – IPL Trade Window Rules : आयपीएलमध्ये कशी होती खेळाडूंची ट्रेडिंग? काय आहेत नियम? जाणून घ्या
एकाच वर्षात दुसऱ्यांदा केलं लग्न –
View this post on Instagram
ऑक्टोबर २०२४ मध्ये काबुल येथे एका भव्य समारंभात राशिद खानने त्याच्या मावस बहिणीशी विवाह केला होता, जिथे त्याच्या तीन भावांनीही विवाह केला होता. मीडिया रिपोर्टनुसार राशिदची दुसरी पत्नी यूकेमध्ये राहणारी अफगाण महिला आहे. अशा प्रकारे राशिद खानने एकाच वर्षांत दुसऱ्यांदा लग्न केल्याचे समोर आले आहे. आपल्या या स्पष्टीकरणानंतर राशिदने लोकांचे लक्ष पुन्हा आपल्या चॅरिटी कार्याकडे वळवले आहे.





