AFG vs NZ one-off Test Match : अफगाणिस्तानच्या संघाची घोषणा, 9 सप्टेंबरपासून भारतात खेळला जाणार कसोटी सामना…

AFG vs NZ one-off Test Match in India : अफगाणिस्तान क्रिकेट संघ भारतातील ग्रेटर नोएडा स्टेडियमवर 9 सप्टेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध एक सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. अफगाणिस्तानचा संघ 28 ऑगस्टलाच या कसोटीसाठी भारतात दाखल आहे, ज्यासाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रथम प्राथमिक संघाची घोषणा केली होती. शहीद विजयसिंह पथिक क्रीडा संकुलात जवळपास आठवडाभर प्रशिक्षण घेतल्यानंतर आता या कसोटी सामन्यासाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाच्या कर्णधारपदाची धूरा ही हशमतुल्ला शाहिदीच्या खांद्यावर असेल, तर गुलबदिन नईबला मात्र संघात स्थान मिळालेले नाही.
गुलबदिन नायब होता प्राथमिक संघाचा भाग…
भारतात आल्यानंतर, अफगाणिस्तान संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी आठवडाभर कसून सराव केला, ज्यामध्ये 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या गुलबदिन नईबचाही समावेश करण्यात आला होता, तरीही त्याला 16 सदस्यीय संघात स्थान मिळालेले नाही.
अफगाणिस्तान संघाचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीबद्दल सांगायचे तर, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन सामन्यांमध्ये त्याने संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे. शाहिदीची कसोटी क्रिकेटमध्ये बॅटने सरासरी 44.09 आहे. त्याच्या बॅटमधून एक शतक आणि 2 अर्धशतकांची खेळी पाहायला मिळाली आहे. अफगाणिस्तानचा संघ या कसोटी सामन्यात आपला स्टार खेळाडू राशिद खानशिवाय खेळणार आहे, ज्याने क्रिकेटच्या या मोठ्या खेळाच्या प्रकारातून (कसोटी) एका वर्षासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 𝐒𝐐𝐔𝐀𝐃 𝐀𝐋𝐄𝐑𝐓! 🚨
The @ACBofficials Selection Committee named 16-member squad for the only test match against New Zealand starting this Monday, in Greater Noida, India. The squad is finalized based on players’ performance in the preparation camp.#AfgvsNZ pic.twitter.com/T9uciEkeuZ
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 6, 2024
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी अफगाणिस्तान संघ : हशमतुल्लाह शाहीदी (कर्णधार), इब्राहिम जादरान, रहमत शाह, अब्दुल मलिक, रियाज हसन, अफसर जजई, इक्रिम अलिखिल (यष्टीरक्षक), बहीर शाह महबूब, शाहिदुल्लाह कमल, अजमतुल्लाह ओमारजई, शम्स उर रहमान, जिया उर रहमान अकबर, जहीर खान पक्तीन, क्वेस अहमद, खलील अहमद, निजात मसूद.





