AFG vs NZ : अफगाणिस्तान-न्यूझीलंड एकमेव कसोटीत पावसाने मारली बाजी, नाणेफेक न होता सामना रद्द…

Afghanistan vs New Zealand Test Match : अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणारी एकमेव कसोटी पावसामुळे वाया गेली. पावसामुळे नाणेफेक न होता सामना रद्द करण्यात आला. हा सामना भारतातील ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ग्राउंड येथे 09 ते 13 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाणार होता, परंतु पावसाने संपूर्ण खेळ खराब केला. तसेच खराब हवामान आणि ओले मैदान तसेच स्टेडियमवरील व्यवस्थापनातील उणीवा हे सामना न होण्याचे कारण ठरले.
सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस झाला नव्हता, फक्त मैदान ओले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही असाच प्रकार घडला. दुसऱ्या दिवशीही सामन्यादरम्यान पाऊस पडला नाही. मात्र, आदल्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण मैदान ओले झाले होते. तिसऱ्या दिवशीही हाच सिलसिला कायम होता. त्यानंतर चौथ्या दिवशी सामन्याच्या वेळी पावसाने दणका दिला. अशाप्रकारे चार दिवसांचा सामना नाणेफेक न होता रद्द करण्यात आला. त्यानंतर पाचव्या दिवशीही पावसाने सामना सुरू होऊ दिला नाही आणि शेवटी अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना नाणेफेक न होता रद्द करावा लागला.
सामना रद्द झाल्याची माहिती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. बोर्डाच्या वतीने एक्सवर असे लिहिले आहे की, “ग्रेटर नोएडामध्ये सततच्या पावसामुळे, बहुप्रतिक्षित अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना एकही चेंडू न टाकताच रद्द करण्यात आला.” पुढे असे लिहिले आहे की, “अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंडची पहिली कसोटी अपेक्षेप्रमाणे पार पडली नाही. अफगाणिस्तान भविष्यात न्यूझीलंडविरुद्ध आणखी द्विपक्षीय क्रिकेटसाठी उत्सुक आहे.”
The highly anticipated #AFGvNZ Test match was called off without a ball being bowled due to persistent rains in Greater Noida.
While the inaugural #AFGvNZ Test didn’t proceed as expected, #AfghanAtalan look forward to engaging in more bilateral cricket with @BLACKCAPS in future. pic.twitter.com/zSVE5Hn2cF
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 13, 2024
आता दोन्ही संघ कोणाविरुद्ध मालिका खेळणार?
कसोटी सामना रद्द झाल्यानंतर, आता अफगाणिस्तान संघ यूएईमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे, तर न्यूझीलंड संघ 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे.
AFG vs SA : द. अफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, ‘या’ स्टार खेळाडूचं कमबॅक…
अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिका 18 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. याशिवाय न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 18 ते 30 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.





