Aditya Thackeray : राम मंदिर देणगी प्रकरणी निष्पक्ष चौकशी करा; आदित्य ठाकरेंची आक्रमक मागणी
Aditya Thackeray : अयोध्येतील राम मंदिर देणग्या आणि निधी संकलनात झालेल्या कथित फसवणुकीच्या आणि गैरव्यवहाराच्या आरोपांवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

Aditya Thackeray : ठाकरेसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी राम मंदिर देणग्यांच्या गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली व्हावी, असे त्यांनी म्हटले आहे. (Aditya Thackeray)
एक्सवरील एका पोस्टमध्ये ठाकरे म्हणाले, देणग्या आणि निधीमध्ये फसवणूक झाल्याच्या आरोपांमुळे अयोध्येतील राम मंदिराच्या दोन विश्वस्तांचे राजीनामा स्वीकारण्यात आले आहेत. परंतु, त्यांची नियुक्ती भाजपच्या केंद्र सरकारने केली होती, या वस्तुस्थितीचे काय? असा सवाल त्यांनी केला. (Aditya Thackeray)
मंदिरातील चोरीचे काय? ज्या मंदिरावर भाजपची गेल्या दोन दशकांतील संपूर्ण मोहीम आधारित होती, त्या मंदिराची लूट करण्याचे धाडस आणि तो गुन्हा याबद्दल काय? आम्हाला निष्पक्ष चौकशी हवी आहे, जी एकतर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली असेल किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली असेल, असे ते म्हणाले. भाजप हिंदूंच्या भावनांशी खेळू शकत नाही, असेही ठाकरे यांनी नमूद केले. (Aditya Thackeray)
काँग्रेसचे ७ जुलैपासून आंदोलन
राम मंदिरातील देणग्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत, त्यामध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसने ७ जुलैपासून राज्यव्यापी आंदोलन करण्याची घोषणा सोमवारी केली. (Aditya Thackeray)
मंगळवारी सकाळी ११ वाजता नाशिकमधील काळाराम मंदिरात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत या आंदोलनाला सूरुवात होईल. भक्तांनी प्रभू रामाला अर्पण केलेली रोख रक्कम आणि सोने यांसारख्या देणग्यांचा आरएसएस आणि भाजपशी संबंधित व्यक्तींनी गैरवापर केल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Aditya Thackeray)
९ ते १४ जुलै दरम्यान महाराष्ट्रातील प्रभू राम, शिव किंवा हनुमान यांच्या मंदिरांमध्ये रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आयोजित केला जाईल. याअंतर्गत पक्षाचे कार्यकर्ते शांततापूर्ण निदर्शने करतील आणि देणग्यांच्या गैरवापरात सहभागी असलेल्यांवर कारवाईची मागणी करण्यासाठी प्रार्थना करतील, असे पक्षाने सांगितले. (Aditya Thackeray)
Aaditya Thackeray : राम मंदिर देणगी प्रकरणी निष्पक्ष चौकशी करा; आदित्य ठाकरे यांची मागणी






