Aaditya Thackeray : राम मंदिर देणगी प्रकरणी निष्पक्ष चौकशी करा; आदित्य ठाकरे यांची मागणी
ठाकरेसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सोमवारी राम मंदिर देणग्यांच्या गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली व्हावी, असे त्यांनी म्हटले आहे.

Aaditya Thackeray : ठाकरेसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सोमवारी राम मंदिर देणग्यांच्या गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली व्हावी, असे त्यांनी म्हटले आहे.
एक्सवरील एका पोस्टमध्ये ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, देणग्या आणि निधीमध्ये फसवणूक झाल्याच्या आरोपांमुळे अयोध्येतील राम मंदिराच्या दोन विश्वस्तांचे राजीनामा स्वीकारण्यात आले आहेत. परंतु, त्यांची नियुक्ती भाजपच्या केंद्र सरकारने केली होती, या वस्तुस्थितीचे काय? असा सवाल त्यांनी केला.
मंदिरातील चोरीचे काय? ज्या मंदिरावर भाजपची गेल्या दोन दशकांतील संपूर्ण मोहीम आधारित होती, त्या मंदिराची लूट करण्याचे धाडस आणि तो गुन्हा याबद्दल काय? आम्हाला निष्पक्ष चौकशी (Aaditya Thackeray) हवी आहे, जी एकतर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली असेल किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली असेल, असे ते म्हणाले. भाजप हिंदूंच्या भावनांशी खेळू शकत नाही, असेही ठाकरे यांनी नमूद केले.






