Aditya thackeray : “उद्धव साहेबांचं मन मोठं…”; ओमराजे निंबाळकरांना आदित्य ठाकरेंची भावनिक साद
Aditya thackeray : 'तळ्यात मळ्यात असो पण डुबायला नको'

Aditya thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. ठाकरे गटाच्या बैठकीला सहा खासदार उपस्थित नसल्याने शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ जवळपास निश्चित मानले जात होते.
मात्र ओमराजे यांचे वडिल पनवराजे निंबाळकर हत्याप्रकरणाचा निकाल सीबीआय कोर्टाने दिला. त्यामध्ये, माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यामुळे, हा ओमराजेंना मोठा धक्का मानला जात आहे.
परंतु त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशाबाबत अद्याप निर्णय झाला नसून, मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच पुढील निर्णय घेणार असल्याचं ओमराजेंनी म्हटलं. ओमराजेंच्या भूमिकेवर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
“उद्धव साहेबांचं मन मोठं आहे, ज्यांना परत यायचं आहे, त्याचं स्वागत आहे. पण, पक्षाच्या विरोधात जातील, त्यांच्यावर कारवाई होणारच… ओमराजे निंबाळकरांशी कुठलाही संपर्क झाला नाही, त्यांचं तळ्यात मळ्यात असो पण डुबायला नको हे त्यांच्यावर आहे, “असे म्हणत आदित्य ठाकरेंनी ओमराजेंना पुन्हा एकदा घरवापसीची साद घातली आहे.
तर, अमित शाहांनी कोल्हापूर दौऱ्यात शिवसेना एकच आहे, ती एकनाथ शिंदेंची, असे म्हटले होते. यापूर्वी शिंदे गट म्हटलं जायचं. पण, आता गट म्हणायलाही शिवसेना उरली नसल्याची टीका अमित शाहांनी केली होती. त्यावरही, आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं.
आदित्य ठाकरेंचे अमित शाह यांना प्रत्युत्तर
“एकच शिवसेना आहे, दुसरी गुलामांची टोळी आहे, एका चोराला मुख्यमंत्री बनायचंय, त्यासाठी हे चाललंय. महाराष्ट्राला माहिती आहे, शिवसेना कोणाची आहे. ज्यांना माझे आजोबा बाळासाहेब ठाकरे यांनी वाचवलं, ते लोक आज शिवसेना आणि ठाकरे कुटुंब संपवायला निघाले आहेत. हे जनता आणि जग बघत आहे. जगभरात भारताची लोकशाही संपत असल्याची चर्चा आहे,” असेही आदित्य यांनी म्हटले. तसेच संजय राऊतांनी सांगितलं, त्याप्रमाणे ऑपरेशन तुडवा हे कुठंतरी होऊ शकते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
ओमराजेंनी ते वृत्त नाकारले
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी, “उद्धव ठाकरे यांना आरोग्याच्या कारणांमुळे सातत्याने फिरणे शक्य नसले, तरी आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहायला हवे होते”, असे विधान केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. पण, ओमराजे निंबाळकर यांनी या वृत्त नाकारले आहे. आपण कधीही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात बोललो नाही आणि भविष्यातही बोलणार नाही, असे ओमराजे यांनी स्पष्टपणे सांगितले.
हेही वाचा:
PMPML Vacancies: पीएमपीएमएलचा कारभार रामभरोसे? तब्बल ६० टक्के पदे रिक्त; चालक-वाहकांचा मोठा तुटवडा






