Sidharth-Kiara : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराचा डिनर डेट लुक; प्रेग्नंसीतही अभिनेत्रीचा खास अंदाज
Sidharth-Kiara : दोघे दुसऱ्यांदा आई-बाबा होणार

Sidharth-Kiara : बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. अलीकडेच दोघं ‘कॉफी विथ करण’च्या सीझन ९ मध्ये पाहुणे कलाकार म्हणून आले होते. यानंतर आता दोघेही डिनर डेटसाठी बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. दोघे मुंबईतील वांद्रे येथे डिनर डेटसाठी पोहोचले होते. यावेळी सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांचा हात धरून चालताना दिसले.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी नुकतेच डिनर डेटसाठी एका रेस्टॉरंटमध्ये आले होते. कारमधून उतरताच पापाराझींची गर्दी झाली. प्रेग्नंसीतही कियारा कमालीची स्टायलिश दिसत होती. तिने गुलाबी रंगाचा सिल्क ड्रेस घातला होता. डीप नेक गुलाबी शिमरी ड्रेसमध्ये ती ग्लॅमरस दिसत होती.
तर सिद्धार्थ टीशर्ट आणि लूज पँट्स अशा कॅज्युअल लूकमध्ये आला होता. त्याने पांढऱ्या रंगाच्या फुल स्लीव्ह टी-शर्टसोबत हलक्या राखाडी रंगाची कार्गो पँट घातली होती. त्यासोबत त्याने ब्लॅक अँड व्हाइट स्नीकर्स परिधान केले होते. त्याचा हा कॅज्युअल अंदाजही खूपच छान दिसत होता.
View this post on Instagram
कियारा आणि सिद्धार्थ रेस्टॉरंटमधून बाहेर पडताच पापाराझींनी त्यांना गराडा घातला. यावेळी सिद्धार्थ आपल्या गरोदर पत्नी कियाराला गर्दीपासून वाचवताना दिसला. त्याने आधी कियाराला सुरक्षितपणे कारमध्ये बसवले. त्यानंतर सिद्धार्थने एकट्याने पापाराझींना एक-दोन पोझ दिल्या आणि मग स्वतः कारमध्ये बसून तिथून निघून गेला. सध्या या जोडप्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये शाही थाटात लग्न केले होते. लग्नाच्या दोन वर्षांनंतर दोघे एका मुलीचे आई-बाबा झाले. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव सरायाह मल्होत्रा ठेवले. आता दोघे दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत.
हेही वाचा:
Kolhapur : शाहाळ्याच्या नारळांचा कल्पक पुनर्वापर; तुळशी विवाहानिमित्त १०० रोपांचे मोफत वाटप





