Tiger Shroff : टायगर श्रॉफचे दमदार कमबॅक! ‘देवा श्री गणेश देवा’ गाण्यावर धरला ठेका
Tiger Shroff : टायगर श्रॉफची ग्लोबल पीस ऑनर्स २०२६ कार्यक्रमात हजेरी
Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर काही दिवसांपूर्वीच मुंबईतील जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथे गोळीबार झाला होता. या घटनेतून तो थोडक्यात बचावला होता. जवळपास महिनाभर सोशल मीडियापासून दूर राहिल्यानंतर अभिनेत्याने दमदार पुनरागमन केलं. त्यानंतर आता तो सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचे देखील पाहायला मिळाले.
ला.
मुंबईत ‘ग्लोबल पीस ऑनर्स २०२६’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यावेळी टायगर श्रॉफने देखील ग्लोबल पीस ऑनर्स २०२६ कार्यक्रमात हजेरी लावत मंचावर एक जबरदस्त नृत्यही सादर केलं.
View this post on Instagram
त्याने ‘देवा श्री गणेश देवा’ या गाण्यावर त्याने परफॉर्मेन्स दिला. त्याचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये तो पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर करताना दिसत आहे.
या कार्यक्रमाला टायगर श्रॉफसह रणवीर सिंग आणि अक्षय कुमार यांनीही हजेरी लावली होती. रणवीर सिंगने ‘धुरंधर’मधील एका गाण्यावर डान्स देखील केला. तरअक्षय कुमारनेही कार्यक्रमात ‘तेरी मिट्टी’ या गाण्यावर एक अप्रतिम सादरीकरण केलं.
दरम्यान, गोळीबारच्या घटनेनंतर टायगर श्रॉफने केलेले दमदार कमबॅक चर्चेत असून, अनेकांंनी सोशल मिडियावर त्याचे कौतुक केले आहे.
हेही वाचा:





