अभिनेत्री रिधिमा पंडितचे मराठीत चित्रपटात पदार्पण; ललितसोबत साकारणार भूमिका

Premachi Gosht 2 | ‘प्रेमाची गोष्ट 2’ हा नवा कोरा रोमॅंटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे यात ‘रोबोट बहू’ म्हणून ओळख मिळवलेली अभिनेत्री रिधिमा पंडित दिसणार आहे.
काही वर्षांपूर्वी हिंदी चॅनलवर प्रसारित होणारी ‘बहु हमारी रजनीकांत’ या मालिकेतून रिधिमाने रोबोटची आगळी वेगळी भूमिका साकारली होती. यानंतर आता ती मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. तिचं मराठी चित्रपटसृष्टीतील पदार्पण केवळ मराठी चाहत्यांसाठीच नाही, तर हिंदी आणि तरुण प्रेक्षकांसाठीही एक खास सरप्राइज ठरणार आहे.
नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘ये ना पुन्हा’ हे रिधिमा आणि ललित प्रभाकरवर चित्रित झालेलं रोमॅण्टिक गाणं सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
रिधिमाचा पहिला मराठी चित्रपट
पहिल्या मराठी चित्रपटाविषयी रिधिमा म्हणाली, “हा माझा पहिला मराठी चित्रपट आहे आणि पहिल्यांदाच मी मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसते. त्यामुळे उत्साह आणि थोडीशी धडधड अशा मिश्र भावना आहेत. सतीश राजवाडे सरांसोबत काम करणं माझ्यासाठी एक खास अनुभव ठरला. ललितसोबत काम करताना खूप मजा आली. तो अत्यंत उत्तम सहकलाकार आहे. एकूणच हा प्रवास माझ्यासाठी खूप स्पेशल आणि अविस्मरणीय ठरला असून प्रेक्षक माझ्या या नव्या प्रवासाला नक्कीच प्रेम देतील, अशी मला खात्री आहे.” Premachi Gosht 2 |
या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून, निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली आहेत. २१ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिद्धिमा पंडित, स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. Premachi Gosht 2 |
हेही वाचा:
‘शक्ती’ चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता; महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? जाणून घ्या…




