अभिनेत्री रेश्मा शिंदे झाली उद्योजिका; पुण्यात सुरू केला नवा व्यवसाय

Reshma Shinde New Business | सध्या अनेक सिने कलाकार अभिनयासह बिझनेसकडे देखील वळत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्राजक्ता माळी, सई ताम्हणकर, अक्षया देवधर यांनी बिझनेस सुरु केला आहे. यातच आता अभिनेत्री रेश्मा शिंदेने देखील नवा व्यवसाय सुरू झाला आहे.
रेश्माने पुण्यात कोथरुड येथे ज्वेलरी शॉप उघडलं आहे. तिने पालमोनास (Palmonas) या ब्रँड सोबत पार्टनरशिप करून हे ज्वेलरी स्टोअर ओपन केले आहे. सोशल मीडियावर श्रद्धाने रेश्माच्या ज्वेलरी स्टोअरचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, “अभिनयाच्या प्रवासात तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम केलं. आता एक नवीन प्रवास तुमच्या साक्षीने सुरू करत आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्या पाठिशी असू दे.”
View this post on Instagram
पुढे तिने लिहिले की, “उद्योजिका म्हणून नवीन प्रवास सुरू करताना मला अतिशय आनंद होत आहे. मी पालमोनास या ब्रँडबरोबर पार्टनरशिप करून हा व्यवसाय सुरू केला आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार. ”
दरम्यान, पालमोनास ब्रँडची को-फाउंडर श्रद्धा कपूर आहे. तिने ज्वेलरी शॉपच्या ओपनिंगसाठी पांढर्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान करून वेस्टर्न लूक केला होता. या पोस्टनंतर अनेक चाहते आणि कलाकार तिचे कौतुक करत तिला शुभेच्छा देत आहेत.
रेश्मा ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून लोकप्रिय झाली. सध्या ती ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत जानकिची भूमिका साकारत आहे.





