Nargis Fakhri : झोपही येत नाही, पुढच्या क्षणी काय होणार.! इराणी ड्रोनमुळे दुबईत अभिनेत्री ‘नरगिस फाखरी’ची उडाली झोप
नरगिस फाखरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दुबईतील घराच्या बाल्कनीतून काढलेली फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

Nargis Fakhri – अमेरिका आणि इस्रायल यांनी मिळून इराणवर हल्ला केल्यापासून संपूर्ण मिडल ईस्टमध्ये तणावाचे वातावरण आहे. या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इराण सातत्याने मिडल ईस्टमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले करत आहे. यूएईमध्येही अनेक ड्रोन हल्ले झाले आहेत.
अशा परिस्थितीत तिथे राहणारे लोक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरी देखील सध्या दुबईतच आहे आणि तिथल्या या परिस्थितीमुळे ती खूप घाबरलेली आहे.
नरगिस फाखरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दुबईतील घराच्या बाल्कनीतून काढलेली फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. एक फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “दोन दिवस खूप वेड लावणारे होते.” याशिवाय तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओही शेअर केला आहे.
हा व्हिडीओही तिने बाल्कनीतून काढला आहे. यात ती दुबईच्या उंच इमारतीतून आकाशाकडे पाहत आहे, जणू काही ती ड्रोन किंवा मिसाइलची शोध घेत आहे किंवा त्याच्या भीतीत आहे.
नरगिसने लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “काहीही झाले तरी, ही चिंता आणि भीती कायम राहते. कारण तुम्हाला माहीत नाही की पुढच्या क्षणी काय होणार आहे. झोपही येत नाही, मेंदू हाय अलर्टवर असतो. इतकी रात्र झाली तरी मी पूर्ण जागी आहे.”
अनेक सेलिब्रिटी यूएईत अडकले आहेत :
नरगिस फाखरीच नाही, तर यूएईमध्ये अनेक बॉलीवूड आणि साउथ सेलिब्रिटी युद्धासारख्या परिस्थितीत अडकले आहेत. तिथून सर्व फ्लाइट्स रद्द झाल्या आहेत आणि लोक अडकले आहेत. भारतात परत येऊ इच्छिणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये ईशा गुप्ता, सोनल चौहान यांचा समावेश आहे. साउथ अभिनेते विष्णू मांचू आणि अजित कुमारही दुबईतच आहेत. एरिका फर्नांडिसही तिथेच आहे.






