अभिनेत्री महिमा चौधरीचा लेकीच्या बॉलीवूड पदार्पणाबद्दल खुलासा, म्हणाली…

Mahima Chaudhry | बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी मुलगी अरियाना चौधरी अलिकडेच ‘अरियाना ‘नादानियां’ चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये दिसली होती. तिचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. तिच्या सौंदर्याचे आणि स्टाइलचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले होते.
१८ वर्षांची अरियानाने नुकतीच हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली आहे. मात्र तिचे बॉलीवूड कलाकारांसोबतचे अनेक फोटो समोर आले आहेत. यानंतर आता महिमाने अरियानाच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल भाष्य केले आहे.
एका मुलाखतीत महिमा चौधरी म्हणाली की, “मला चित्रपट आवडतात. मला क्रिएटिविटी आवडते आणि ती माझ्या इतिहासाचा एक भाग व्हावी अशी माझी इच्छा आहे. सध्या लवकरच नाही, पण ती बॉलिवूडमध्ये येईल. मी जो आयुष्यात सेटअप केला आहे. तो येथेच केला आहे. मुंबईपेक्षा चांगले काहीही नाही. म्हणून मला वाटते की तिने इथेच राहावे.” Mahima Chaudhry |
View this post on Instagram
महिमा चौधरीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता शाहरुख खानसोबतच्या ‘परदेस’ या चित्रपटामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. अलीकडेच महिमा ‘दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी’ या चित्रपटात संजय मिश्रा यांच्यासोबत झळकली. यापूर्वी ती ‘नादानियां’ चित्रपटात दिसली होती. Mahima Chaudhry |
हेही वाचा:
राज्य, देश आणि मनोरंजन विश्वातील महत्वाच्या १० बातम्या वाचा एका क्लिकवर





