मुंबई : ९० च्या दशकातील गाजलेली अभिनेत्री महिमा चौधरी कर्करोगाने ग्रस्त होती. आता ती या रोगातून बरी झाली आहे . त्यानंतर तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने तिच्या फॅन्सचे आभार मानले आहेत. मध्यंतरी तिचा ट्रीटमेंट सुरु असतानाचा फोटो पाहून अनेकांना धक्का बसला होता. आता महिमाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओ मध्ये तिच्या लूकमध्ये बदल झालेला दिसतो आहे.
View this post on Instagram
व्हिडीओ शेअर करत तिने सांगितले की , ‘मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छिते ज्यांनी मला पूर्वी प्रेम आणि शुभेच्छा पाठवल्या. काहींनी माझा नंबर शोधून संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. मी इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि ईमेलवर प्रत्येकाला वैयक्तिकरित्या आभार मानत आहे. तिने तिच्यावर ट्रीटमेंट केलेल्या डॉक्टर्स ,नर्स, सर्जन यांचे देखील या व्हिडीओ मध्ये आभार मानले आहेत.
महिमाने कॅन्सर वर मुंबईतील धीरूभाई कोकिलाबेन आंबानी हॉस्पिटल येथे उपचार करुन घेतले. याबरोबरच महिमा ने या व्हीडीमध्ये तुषार आणि टीना आंबानी यांना देखील धन्यवाद दिले आहेत. शेवटी प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांचे देखील महिमाने आभार मानले आहेत. ‘ थँक यु अनुपम खेर तुम्ही मला आतमविश्वास दिला माझ्यामध्ये धाडस निर्माण केले. अगदी नरकातून ओढून आणत हात देत तुम्ही मला पुन्हा सेट वर आणलं त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. मी पूर्णपणे निरोगी आणि आनंदी आहे असे तिने आपल्या व्हिडिओत म्हंटले आहे .