मुंबई – ‘बडे अच्छे लगते हैं’ फेम अभिनेत्री दिशा परमारच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. दिशा आणि तिचा पती राहुल वैद्य यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लवकरच आई-वडील होणार असल्याची माहिती दिली आहे. इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दोघांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
या जोडीनं या खुशखबरीसाठी एक छोट फोटो सेशन देखील केल्याचे पाहायला मिळते. फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत ब्लॅक ड्रेसमध्ये उभे आहेत. पती राहुलने हातामध्ये एक पाटी पकडली आहे ज्यावर मम्मी आणि डॅडी असं लिहिलं आहे. यासह दिशाने थेट सोनोग्राफी वाला फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
यावेळी दिशाने लिहिले, “हॅलो फ्रॉम मम्मी डॅडी टू बी अँड द बेबी !” अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी शेअर करताच चाहत्यांनी या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेक सेलिब्रिटींनी देखील यावर कमेंट करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
असं केलं होत प्रपोज
बर्थडे सरप्राईज म्हणून राहुलने दिशाला बिग बॉस 14 मध्ये प्रपोज केले होते. दिशाने त्याला उत्तरही पाठवले आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी शोमध्ये भेटायलाही गेली. दोघेही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून भेटले होते आणि त्यांच्यात मैत्री झाली होती. 2019 मध्ये राहुल वैद्यच्या “याद तेरी” या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्येही दिशा दिसली होती.