अभिनेत्री छाया कदम हिची दुसऱ्यांदा कान्सवारी! गुलाबी साडीतला सुंदर फोटो केला शेअर

Cannes Festival Chaya Kadam Post : १३ मे २०२५ पासून फॅान्स येथे दि कान्स चित्रपट महोत्सवाला सुरूवात झाली आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर हॅालीवूड कलाकारांसोबत बॅालीवूडमधील कलाकारांनी देखील उपस्थित दर्शवली आहे. नुकताच कान्सच्या रेड कार्पेटवरून अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचा फोटो व्हायरल झाला होता. तिने परिधान केलेल्या आउटफिटची जोरदार चर्चा झाली. यानंतर आता अभिनेत्री जाकलिन फर्नांडिस हिने देखील कान्सला हजेरी लावली आहे.
बॅालीवूड कलाकारांबरोबरच यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम हिने देखील दुसऱ्यांदा हजेरी लावली आहे. अभिनेत्री छाया कदमने कान्सला हजेरी लावण्यानंतर आनंद व्यक्त केला. तिने गुलाबी साडीतील सुंदर फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. या साड्यात ती खूप सुंदर दिसत आहे.
छाया कदमची पोस्ट
२०२५ मधील कान्स फिल्म फेस्टीव्हलचा हा पहिला दिवस. मागच्या वर्षी बरोबर याच वर्षी याच दिवशी माझ्या कान्समधाल पहिला होता. त्यावेळी अगदी नवखी असल्यासारखे वावरत होते. काही गोष्टींचे उगाचच दडपण घेतलं होतं. पण ते ही मी एन्जॅाय केलं होतं. यावर्षी ही जागा हे शहर आणि इथे भेटणारी माणसं सगळं आपलं वाटतंय. इथल्या रस्त्यांसोबत इथल्या रंगीबेरंगी कपडे घातलेल्या माणसांसोबत जुनी ओळख असल्यासारख वाटतंय, अशी पोस्ट छाया कदम हिने शेअर केली आहे.
गेल्या वर्षीच्या कान्स फेस्टीव्हलमुळे तयार झालेले कुटुंब यावर्षी अजून विस्तारत गेल्याचे जाणवले. आता उत्सुकता आहे ती आजच्या माझ्या आणि अर्थात आपल्या Snow Flower च्या स्क्रिनिंगची, असे देखील तिने पोस्टमध्ये नमूद केले आहे.
View this post on Instagram
‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ हा २०२४ मध्ये कान्स चित्रपट महोत्सवात चित्रपट दाखविण्यात आला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन पायल कपाडिया यांनी केले असून छाया कदम यांनी चित्रपटात महत्वाची भूमिका साकारलेली होती. या चित्रपटाच बरंच कौतुक झालं होतं. २०२४ मध्ये छाया कदम हिने पहिल्यांदा कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती. आता ती दुसऱ्यांदा या महोत्सवात सहभागी झाली आहे. २०२४ कान्स फेस्टीव्हलमध्ये आईची साडी, नथ, केसात गजरा आणि कपाळावर टिकली असा मराठमोळ्या छाया कदमच्या लूकची बरीच चर्चा त्यावेळी झाली होती.




