नाकात नथ, कपाळी टीळा; अभिनेत्री छाया कदमचा वारीत सहभाग, मंत्रमुग्ध अनुभव म्हणत व्हिडीओ केला शेअर

Actress Chhaya Kadam : सध्या संताच्या पालख्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत. लाखो वारकरी वारीत सहभागी झाले असून, विठ्ठलाच्या नामस्मरणात पंढरपूरकडे वाटचाल करत आहेत. ही वारी पाहणे म्हणजे खूप मोठी पर्वणी आहे. या वारीत कलाविश्वातील कलाकार मंडळीही सहभागी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वारीचा अनुभव शेअर केला आहे.
अभिनेत्री छाया कदम हि देखील वारीत पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाली होती. तिच्या पहिल्या वारीतला खास व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. या खास व्हिडीओत छाया कदम वारीत सहभागी झाल्याचे असल्याचे दिसत आहे. याशिवाय तिने वारकऱ्यांसोबत फुगडी देखील घातली आहे. तिचा वारीचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओत छाया कदम पारंपारिक वेशभूषेत पाहायला मिळत आहे. तिने सुंदर साडी नेसली आहे. साडीत तिचे सौंदर्य खूप खुलून दिसत आहे. नाकात नथ, केसात गजरा आणि डोक्यावर टिळा लावून छाया कदम वारीत सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. विठू नामाच्या गजरात ती तल्लीन झाली असल्याचे दिसत आहे. याच व्हिडीओत ती बांगड्या भरताना देखील पाहायला मिळत आहे.
“पहिलीच वारी जणू जन्मास उभारी…||विठ्ठल…विठ्ठल…विठ्ठल|| याची देही याची डोळा,ऐसा देखिला सोहळा…” असे सुंदर कॅप्शन अभिनेत्री छाया कदमने या व्हिडीओला दिले आहे. आजवर अभिनेत्री छाया कदम हिने अनेक चित्रपटातून आपली अभिनय शैली प्रेक्षकांना दाखवून दिली आहे. मराठीसोबतच तिने हिंदी चित्रपटातही काम केले आहे. तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.





