आता थांबायचं नाय…! नामांकित अभिनेत्रींना टाकलं मागे; मराठमोळी अभिनेत्री छाया कदमची ‘या’ पुरस्कारावर मोहोर

Chhaya Kadam : मराठमोळी अभिनेत्री छाया कदमने मराठी सिनेसृष्टीसह बॅालिवूडमध्येही आपल्या कामाचा ठसा उमटला आहे. तिने काही सिनेमांत केलेल्या कामांमुळे तिची दखल बॅालिवूड इंडस्ट्रीने घेत तिचा सन्मान केला आहे. हिंदी सिनेसृष्टीसाठी प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ७० व्या फिल्मफेअर अवॅार्ड्स २०२५ मध्ये अभिनेत्री छाया कदम हिला सर्वेात्कृष्ट सहाय्यक कलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे.
किरण राव यांनी दिग्दर्शित केलेल्या लापता लेडिज या सिनेमातील मंजू या व्यक्तीरेखेसाठी छाया कदम यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार स्विकारल्यानंतर छाया कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मी एका छोट्या गावातून मुंबईत आले. वर्षानुवर्षांच्या मेहनतीनंतर आज या मंचावर उभं राहणं म्हणजे माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा सन्मान आहे, असे छाया कदम म्हणाल्या. यावेळी त्या भावूक झाल्याचे पाहिला मिळाले.
View this post on Instagram
हा पुरस्कार त्या प्रत्येकासाठी आहे जे या क्षेत्रात काम करताना विचार करतात अपना टाईम कब आयेगा. थँक्यू किरण माझ्यावर विश्वास ठवलास आणि या मराठी मुलीला यूपीची मंजूमाई केलस असे म्हणत छाया यांनी किरण राव यांचे आभार मानले. किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा सिनेमा ग्रामीण भारतातील सामाजिक वास्तव, स्त्रियांचं अस्तित्व आणि ओळख या विषयावर आधारित आहे. या सिनेमाची बरीच चर्चा रिलीज झाल्यानंतर झाली होती. सिनेमाने अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार जिंकलेले आहेत.
सर्वाेत्कृष्ट सहाय्यक कलाकाराच्या श्रेणीत हिंदीतील अनेक अभिनेत्रींचे नाव नॅामिनेशनमध्ये होते. यामध्ये माधुरी दीक्षित, शेफाली शाह, रत्ना पाठक आणि तिलोत्तमा शोम अशा नामांकित अभिनेत्रींचा समावेश होता. मात्र, या अभिनेत्रींना मागे टाक छाया कदम यांनी हा पुरस्कावर आपल्या नावावर केला आहे.
हेही वाचा : ट्रम्पची धमकी फेल! हमासने गाझा योजनेवर स्वाक्षरी करण्यास दिला नकार ; प्रस्तावांना म्हटले ‘हास्यास्पद’


