NCP Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते फडणवीसांच्या भेटीला कारण..
NCP Sunetra Pawar : सुमारे दीड महिन्यानंतर झालेल्या या बैठकीनंतर सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याचे वृत्त आहे.

NCP Sunetra Pawar : राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षातील महत्वाची नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
आज सकाळी ९ वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. सुमारे दीड महिन्यानंतर झालेल्या या बैठकीनंतर सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याचे वृत्त आहे.
या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः राज्याच्या अर्थखात्याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अर्थखात्याच्या मागणीवर चर्चा होणार?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अर्थखात्यासह पक्षांतर्गत बदलांच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाल्याने यास विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
या भेटीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांसारखे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्थखात्याची मागणी करण्यात आली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षाला पुन्हा अर्थखाते मिळणार का? याबाबत चर्चा रंगली आहे.
विधान परिषद निवडणूक, दुष्काळ आणि एसआयआरवरही चर्चा
दरम्यान, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील महत्त्वाच्या राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत विधान परिषद निवडणूक, राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि एसआयआर (विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण) प्रक्रियेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.
Anant Singh: ‘मला कोणताही पश्चात्ताप नाही…’ ; जेडीयूमधून हकालपट्टीनंतर अनंत सिंगची पहिली प्रतिक्रिया






