Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची घरवापसी? चर्चांना उधाण; काँग्रेस नेत्याने सांगून टाकलं…
Maharashtra Politics : देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे अनेक नेते पुन्हा काँग्रेसच्या मूळ प्रवाहात येण्यास इच्छुक असल्याचा मोठा दावाही नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षात कोणाची घरवापसी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

या चर्चांना वेग आला असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले “अशोक चव्हाण यांच्याबाबत राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. मात्र, चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांच्या पक्षप्रवेशाबाबत अंतिम निर्णय काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्वच घेईल.”
नाना पटोलेंचा मोठा दावा
देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे अनेक नेते पुन्हा काँग्रेसच्या मूळ प्रवाहात येण्यास इच्छुक असल्याचा मोठा दावाही नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षात कोणाची घरवापसी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
२०२४ मध्ये आघाडीचे सरकार सत्तेवर येणार होते.
२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार होते, असा खळबळजनक दावाही नाना पटोले यांनी केला आहे. निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे ७५, तर महाविकास आघाडीचे एकूण १६० आमदार निवडून येतील, असा अहवाल इंटेलिजन्स ब्युरोने (IB) सरकार आणि विरोधकांना दिला होता, असे त्यांनी म्हटले. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.
मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजल्यानंतर बोगस मतदानाच्या आकडेवारीत अचानक वाढ करून महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी महायुतीवर केला. त्यांच्या विविध दाव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कर्जतमधील वृक्षतोडीवरून सरकारला आंदोलनाचा इशारा
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे प्रस्तावित ३,००० मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीचा मुद्दाही नाना पटोले यांनी उपस्थित केला. या प्रकल्पासाठी ३५ हजारांहून अधिक झाडे तोडली जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पाचे कंत्राट असलेल्या टोरेंट कंपनीचे प्रमुख मेहता हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निकटवर्तीय असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. “मोदी आणि फडणवीस सरकारला महाराष्ट्राचे वाळवंट करू देणार नाही. कर्जतमधील वृक्षतोड तातडीने थांबवली नाही, तर काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल” असा थेट इशारा नाना पटोले यांनी दिला.






